दलजीत कौर भनोटचे टॉपलेस फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 16:05 IST2017-03-31T10:35:41+5:302017-03-31T16:05:41+5:30
दलजीत कौर भनोटने कुलवधू, इस प्यार को क्या नाम दूँ, कहानियाँ विक्रम और वेताल की यांसारख्या मालिकांमध्ये काम केले ...
.jpg)
दलजीत कौर भनोटचे टॉपलेस फोटोशूट
द जीत कौर भनोटने कुलवधू, इस प्यार को क्या नाम दूँ, कहानियाँ विक्रम और वेताल की यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेता शालीन भनोटसोबत लग्न केल्यानंतर ती अभिनयापासून काहीशी दूर गेली होती. ती अनेक वर्षांनंतर काला टीका या मालिकेत झळकली. शालीन भनोट आणि दलजीतमध्ये मतभेद झाल्यानंतर ते आता वेगळे राहात आहेत. त्यामुळे आता दलजीतने छोट्या पडद्यावर कमबॅक केले.
![daljeet kaur]()
या मालिकेत संधी दिल्याबद्दल या मालिकेच्या टीमची ती प्रचंड आभारी आहे. या मालिकेच्या सुरुवातीला दलजीत आपल्याला थोडीशी स्थूल वाटत होती. पण आता व्यायाम करून आणि डाएट करून दलजीतने तिचे कित्येक किलो वजन कमी केले आहे. यामुळे दलजीत आता पहिल्यापेक्षा अतिशय सुंदर दिसत आहे. वजन कमी झाल्यापासून मी अधिक तरुण दिसत असल्याचे मला वाटत आहे असे दलजीतने नुकतेच कबूल केले आहे.
![daljeet kaur]()
दलजीतला आता प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करण्याची इच्छा आहे. दलजीत आणि शालीनला एक चार वर्षांचा मुलगादेखील आहे. दलजीतने तिच्या मुलासोबत नुकतेच एक फोटोशूट केले आहे.
![daljeet kaur son]()
या आई-मुलाच्या क्युट फोटोंची चर्चा तर होत आहे. पण त्याचसोबत तिने काही तिचे बोल्ड फोटोदेखील अपलोड केले आहेत.
![daljeet kaur son]()
एका फोटोत तर ती टॉपलेस असून तिने तिच्या सुंदरतेत आणखी भर घालण्यासाठी मोठी टिकली आणि मोठी नथ घातली आहे. यासोबतच तिने तिचे आणखी काही बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
दलजीतची मालिकांमधील इमेज ही अतिशय सोबर आहे. हे फोटोशूट पाहिल्यानंतर दलजीत आता तिची इमेज बदलण्याचा प्रयत्न करत आहे अशीदेखील जोरदार चर्चा सुरू आहे.