​उर्वशी ढोलकियाचा चंद्रकांता मालिकेद्वारे कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 10:13 IST2017-06-16T04:41:47+5:302017-06-16T10:13:55+5:30

एकता कपूरच्या चंद्रकांता या मालिकेत उर्वशी ढोलकिया झळकणार आहे. उर्वशीने वक्त की रफार या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ...

Comeback by Urvashi Dholakia's Chandrakant Series | ​उर्वशी ढोलकियाचा चंद्रकांता मालिकेद्वारे कमबॅक

​उर्वशी ढोलकियाचा चंद्रकांता मालिकेद्वारे कमबॅक

ता कपूरच्या चंद्रकांता या मालिकेत उर्वशी ढोलकिया झळकणार आहे. उर्वशीने वक्त की रफार या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती देख भाई देख या मालिकेत झळकली. या मालिकेतील शिल्पा या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यानंतर घर एक मंदिर, कभी सौतन कभी सहेली यांसारख्या मालिकांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारल्या. पण खऱ्या अर्थाने तिला कसौटी जिंदगी की या मालिकेने प्रसिद्धी दिली. या मालिकेतील कोमोलिका ही तिची भूमिका चांगलीच गाजली होती. आज ही मालिका संपून 17 वर्षं झाली असली तरी प्रेक्षक तिला कोमालिका म्हणूनच ओळखतात. उर्वशीने बिग बॉस या कार्यक्रमातदेखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील तिला मिळाले होते.
2015मध्ये ती बडी दूर से आये है या मालिकेत झळकली होती. पण गेल्या दोन वर्षांपासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. आता ती चंद्रकांता या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत झळकणार असून ती या मालिकेत चेटकिणीची भूमिका साकारणार आहे. उर्वशी या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. कमबॅकसाठी ही मालिका आणि त्यातील भूमिका अतिशय योग्य असल्याचे तिचे म्हणणे आहे. कोमालिका या भूमिकेमुळे प्रेक्षकांना उर्वशी नकारात्मक भूमिकेतच अधिक आवडते. आता अनेक वर्षांनी ती नकारात्मक भूमिकेद्वारेच प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना तिची ही भूमिका आवडेल अशी तिला खात्री आहे. 
उर्वशीने खूपच कमी वयात लग्न केले होते. तिला दोन जुळी मुले असून ती आता 21 वर्षांची आहेत. मुलांना वेळ देण्यासाठीच तिने काही काळांचा ब्रेक घेतला होता. 

Web Title: Comeback by Urvashi Dholakia's Chandrakant Series