कुशल पाठोपाठ 'मॅडनेस मचाएंगे'मध्ये सागर कारंडेची एन्ट्री; प्रोमो व्हिडीओमध्ये दिसली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 11:36 AM2024-05-26T11:36:21+5:302024-05-26T11:37:28+5:30

Sagar karande: 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता सागर कारंडेची 'मॅडनेस मचाएंगे' या विनोदी कार्यक्रमात एन्ट्री झाली आहे.

chala-hawa-yeu-dya-fame-sagar-karande-entry-in-sony-tv-madness-machayenge-with-kushal-badrike | कुशल पाठोपाठ 'मॅडनेस मचाएंगे'मध्ये सागर कारंडेची एन्ट्री; प्रोमो व्हिडीओमध्ये दिसली झलक

कुशल पाठोपाठ 'मॅडनेस मचाएंगे'मध्ये सागर कारंडेची एन्ट्री; प्रोमो व्हिडीओमध्ये दिसली झलक

गेल्या काही काळात हिंदी कलाविश्वामध्ये मराठी कलाकारांची रेलचेल वाढल्याचं दिसून येत आहे. अनेक मराठी कलाकार हिंदी मालिकांसह सिनेमांमध्ये झळकत आहेत. यामध्येच सध्या सोनी टीव्हीवरील 'मॅडनेस मचाएंगे' या कार्यक्रमात कुशल बद्रिके (kushal badrike), हेमांगी कवी (hemangi kavi), गौरव मोरे (gaurav more) यांसारखे मराठी कलाकार झळकत आहेत. यामध्येच आता 'चला हवा येऊ द्या' फेम (chala hawa yeu dya) आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची या कार्यक्रमात एन्ट्री झाली आहे.

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता सागर कारंडे (sagar karande) याची 'मॅडनेस मचाएंगे' या विनोदी कार्यक्रमात एन्ट्री झाली आहे. सोनी टीव्हीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सागरची झलक पाहायला मिळाली.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर सागर कारंडेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मॅडनेस मचाएंगे या कार्यक्रमातला हा प्रोमो असून त्याच्या सोबत गौरव दुबे आणि स्नेहील मेहरादेखील दिसून येत आहेत.

दरम्यान, सागरने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील अनेक पात्र गाजवली. यात पोस्टमन  काका, पुणेरी बाई यांसारख्या त्याच्या अनेक भूमिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाल्या.

Web Title: chala-hawa-yeu-dya-fame-sagar-karande-entry-in-sony-tv-madness-machayenge-with-kushal-badrike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.