लेकीच्या जन्मानंतर सई लोकूरने दिली आणखी एक गुडन्यूज; व्हिडीओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 01:12 PM2024-05-22T13:12:04+5:302024-05-22T13:12:37+5:30

Sai lokur: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सईने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

bigg boss marathi fame actress sai lokur share new house welcome video on social media | लेकीच्या जन्मानंतर सई लोकूरने दिली आणखी एक गुडन्यूज; व्हिडीओ केला शेअर

लेकीच्या जन्मानंतर सई लोकूरने दिली आणखी एक गुडन्यूज; व्हिडीओ केला शेअर

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर (sai lokur) सध्या तिचं आईपण अनुभवत आहेत. काही महिन्यांपूर्वीच सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे इंडस्ट्रीतून काही काळासाठी तिने ब्रेक घेतला आहे. मुलीच्या जन्मानंतर सईने आणखी एक गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. सईने नुकतंच तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सईने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या नव्या घराची झलक दाखवली आहे. तसंच तिच्या सासूबाईंनी मोठ्या उत्साहात सईचं या नव्या घरात स्वागत केलं.

सईने तीर्थदीप याच्यासोबत लग्न केलं असून लग्नानंतर ते स्वतंत्रपणे रहात होते. परंतु, गेल्याच वर्षी त्यांनी बंगळुरूमध्ये नवीन घर घेतलं असून आता सई तिच्या लाडक्या लेकीसोबत या घरात शिफ्ट झाली आहे. त्यामुळे सध्या तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सई बिग बॉस मराठीमध्ये झळकली होती. यापूर्वी तिने काही मोजक्या मालिकांमध्ये काम केलं होतं. मात्र, लग्नानंतर तिचा इंडस्ट्रीतील वावर बऱ्यापैकी कमी झाला आहे. परंतु, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय असून अनेकदा ब्रँड प्रमोशन ती करताना दिसते.

Web Title: bigg boss marathi fame actress sai lokur share new house welcome video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.