Bigg Boss Marathi 4 : अपूर्वाला जिंकवा...! ‘शेवंता’चे फॅन्स मुंबईच्या रस्त्यावर, ठिकठिकाणी झळकवले बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 03:31 PM2023-01-06T15:31:06+5:302023-01-06T15:32:24+5:30

Bigg Boss Marathi 4, Apurva Nemlekar: ‘बिग बॉस मराठी 4’ची ट्रॉफी कोण जिंकणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्राला लागली आहे. अशात आता चाहत्यांची लाडकी ‘शेवंता’ अर्थात अपूर्वा नेमळेकर हिला जिंकवण्यासाठी तिचे चाहते मैदानात उतरले आहेत.

Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar fans promoting banner and supporting her | Bigg Boss Marathi 4 : अपूर्वाला जिंकवा...! ‘शेवंता’चे फॅन्स मुंबईच्या रस्त्यावर, ठिकठिकाणी झळकवले बॅनर

Bigg Boss Marathi 4 : अपूर्वाला जिंकवा...! ‘शेवंता’चे फॅन्स मुंबईच्या रस्त्यावर, ठिकठिकाणी झळकवले बॅनर

googlenewsNext

बिग बॉस मराठी’चं चौथे पर्व (Bigg Boss Marathi 4) धम्माल रंगलं आणि आता हा प्रवास निर्णायक टप्प्यावर आला आहे.  होय, अवघ्या दोन दिवसांनी या खेळाचा विजेता आपल्या समोर येणार आहे. ‘बिग बॉस मराठी 4’ची ट्रॉफी कोण जिंकणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्राला लागली आहे. अशात आता चाहत्यांची लाडकी ‘शेवंता’ अर्थात अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिला जिंकवण्यासाठी तिचे चाहते मैदानात उतरले आहेत.

कुठे बॅनर तर कुठे पोस्टर घेऊन तिचे चाहते मुंबईच्या नाक्या नाक्यांवर उभे आहेत. भरगोस मतदान करून अपूर्वाला विजयी करा अशी विनंती तिच्या चाहत्यांनी केली आहे. याचे फोटो आता सोशल मिडियावर झळकत आहे. अपूर्वानेही याचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे.

 गेल्या 2 ऑक्टोबरला  ‘बिग बॉस मराठी 4’ हा शो सुरू झाला होता आणि बघता बघता येत्या 8 तारखेला या शोचा ग्रँड फिनाले रंगणार आहे.   सोळा स्पर्धकांसोबत सुरु झालेला हा प्रवास टॉप पाच स्पर्धकांवर आला आहे. त्यामुळे या पर्वात कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात अपूर्वा नेमळेकर ही विजेतेपदाची तगडी दावेदार मानली जात आहे.  

95 दिवसांचा टप्पा पार करत  आणि तिकीट टू फिनाले मिळवत ती थेट टॉप फाइव्ह मध्ये गेली. अगदी पहिल्या दिवसापासूनच तिने आक्रमक खेळ खेळला. अगदी नडणाऱ्या प्रत्येकाशी ती भिडली. अर्थात या शोमध्ये एक हळवी अपूर्वाही अनेकांनी पाहिली. अनेकदा ती पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसली. अनेकदा रडली, भावुक झाली.   मेघा, स्नेहलता यांच्याशी तिची मैत्रीही बहरली. 

Web Title: Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar fans promoting banner and supporting her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.