Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामधून स्नेहा वाघ बाहेर, नेटकरी झाले खूष!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 09:50 AM2021-11-22T09:50:05+5:302021-11-22T09:51:02+5:30

Bigg Boss Marathi 3: अखेर अभिनेत्री स्नेहा वाघ हिचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे.

Bigg Boss Marathi 3: Sneha Wagh out of Bigg Boss Marathi's house, Netkari is happy! | Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामधून स्नेहा वाघ बाहेर, नेटकरी झाले खूष!

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामधून स्नेहा वाघ बाहेर, नेटकरी झाले खूष!

googlenewsNext

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 3)चा हा आठवडा विशेष ठरला कारण घराला मिळाले होते टॉप १० सदस्य. आठवड्याच्या सुरूवातीपासूनच घरामध्ये राडे बघायला मिळाले... घरातील समीकरण बदलताना दिसली. मीनल आणि गायत्री, तर जय आणि विकास मध्ये राडा झाला. मीरा आणि उत्कर्ष होते गायत्रीवर नाराज तर, विकास आणि सोनालीमध्ये दखील झाले भांडण… दुसरीकडे कार्यामध्ये विघ्न आणाल्या कारणाने मीरा आणि विशालला भोगावी लागली कारागृहाची शिक्षा... गायत्री दातार बनली घराची कॅप्टन... हे सगळं घडत असतानाच घरामध्ये काही खास पाहुण्यांची एन्ट्री झाली. 

घरामध्ये झालेल्या राड्यांवर महेश मांजरेकर यांनी सदस्यांची शाळा घेतली, कोण कुठे चुकते आहे हे सांगितले आणि सदस्यांची कानघडणी केली. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये वूटद्वारे आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे स्नेहाला सांगितली. तर दादूस, विकास आणि विशाल यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये वूटद्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली. नॉमिनेशन कार्यात या आठवड्यात घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये उत्कर्ष, दादूस, मीरा, स्नेहा, गायत्री आणि सोनाली नॉमिनेट झाले. कालच्या भागामध्ये या सदस्यांमध्ये गायत्री, सोनाली सेफ झाली आणि उत्कर्ष, मीरा, स्नेहा आणि दादूस डेंजरमध्ये गेले.

स्नेहा वाघचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला...

मीरा आणि स्नेहा डेंजर झोनमध्ये होते ज्यामध्ये स्नेहा वाघला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. स्नेहाच्या जाण्याने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला जातो आहे. टीम ए मधील सदस्याच्या जाण्याने नेटकरी भलतेच खुश झाले आहेत. एका युजरने म्हटले, जाऊ दे आता जा घऱी आणि सारंगे कर आणि जयला घरातून बघत जा आता. आणि रिअल बिस्किटे खा हा का घरी जाऊन. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, काकू लेट झालाय..तुम्ही आता मस्त सारंगे विकत बसा घरी... तर आणखी एका युजरने म्हटले की, बरं झालं चालली बाहेर. एक जण म्हणाले की, स्नेहा काकू घरी चालल्या आहेत आता. घराबाहेर काढायला थोडा वेळ लागला, पण इट्स ओके.
कसा असणार नवा आठवडा ? कोणते सदस्य होणार नॉमिनेट ? कोणकोणते नवे टास्क घरामध्ये रंगणार ? यासाठी बिग बॉस मराठीचा आजचा एपिसोड पाहावा लागेल.

Web Title: Bigg Boss Marathi 3: Sneha Wagh out of Bigg Boss Marathi's house, Netkari is happy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.