Bigg Boss Marathi 3: गायत्री दातार नाही तर 'हा' सदस्य आहे वयाने सर्वात लहान, जाणून घ्या सर्व सदस्यांचे वय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 12:06 IST2021-10-09T12:06:04+5:302021-10-09T12:06:39+5:30

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Bigg Boss Marathi 3: Gayatri Datar is not youngest member in the bigg boss house, know the age of all members | Bigg Boss Marathi 3: गायत्री दातार नाही तर 'हा' सदस्य आहे वयाने सर्वात लहान, जाणून घ्या सर्व सदस्यांचे वय

Bigg Boss Marathi 3: गायत्री दातार नाही तर 'हा' सदस्य आहे वयाने सर्वात लहान, जाणून घ्या सर्व सदस्यांचे वय

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनला १९ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. हा शो निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर होस्ट करत आहेत. यंदाच्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शोमध्ये स्नेहा वाघ, जय दुधाणे, सोनाली पाटील, विशाल निकम, मीरा जगन्नाथ, विकास पाटील, गायत्री दातार, उत्कर्ष शिंदे, मीनल शाह, सुरेखा कुडची, तृप्ती देसाई, अक्षय वाघमारे आणि संतोष चौधरी हे कलाकार सहभागी झाले आहेत. या सदस्यांचे वय तुम्हाला माहित आहे का?, चला तर जाणून घेऊयात बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांचे.

स्नेहा वाघबिग बॉसमध्ये सहभागी झालेली स्नेहा वाघ ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. स्नेहा वाघ हिचे वय सध्या ३४ वर्ष आहे. स्नेहा वाघचा जन्म ४ ऑक्टोबर १९८७ रोजी झाला आहे.

सोनाली पाटील – सोनाली पाटील हेदेखील या शोमध्ये आता चांगलीच रमली आहे. सोनाली पाटील सध्या ३४ वर्षांची आहे. तिचा जन्म ५ मे १९८७ रोजी झाला आहे.


जय दुधाने – जय दुधाने हादेखील या शोमधे सध्या चर्चेत आहे. जय दुधानेचे वय केवळ २२ वर्ष आहे. त्याचा जन्म २५ जुलै १९९८ मध्ये झाला आहे. घरात सर्वात लहान सदस्य जय आहे.

विशाल निकम – विशाल निकम हा मुळचा सांगली जिल्ह्यातला रहिवासी आहे. तिचा जन्म १० फेब्रुवारी १९९४ मध्ये झाला आहे. सध्या तो २७ वर्षांचा आहे.

मीरा जगन्नाथ – मीरा जगन्नाथ या शोमध्ये पहिल्यापासूनच वादग्रस्त ठरली आहे. मीरा जगन्नाथ हिचा जन्म २० ऑक्टोबर १९९८ मध्ये झाला आहे. ती सध्या २३ वर्षाची आहे. 

विकास पाटील – या शोसोबत विकास पाटील देखील आता चांगलाच चर्चेत आला आहे. त्याचा जन्म २८ सप्टेंबर, १९८२ मध्ये झाला आहे. तो सध्या ३९ वर्षाचा आहे.

गायत्री दातार तुला पाहते रे या मालिकेतून चर्चेत आलेली गायत्री दातार बिग बॉसमध्ये सहभागी झाली आहे. तिचा जन्म १० मार्च १९९५ मे रोजी झाला आहे. सध्या ती २६ वर्षांची आहे.

डॉ. उत्कर्ष शिंदे – डॉक्टर उत्कर्ष शिंदे हा प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा मुलगा आहे. उत्कर्ष याचे वय सध्या ३५ वर्षे आहे. त्याचा जन्म ११ जानेवारी १९८७ मध्ये झाला आहे.

शिवलीला पाटील – शिवलीला पाटील या प्रसिद्ध किर्तनकार आहेत. त्यांचा जन्म ११ जानेवारी १९९४ मध्ये झाला आहे. सध्या त्या २७ वर्षांच्या आहेत. मात्र आता त्या बिग बॉस मधून बाहेर पडल्या आहेत.

तृप्ती देसाई – भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या देखील या शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांचा जन्म १२ डिसेंबर १९८५ मध्ये झाला आहे, त्या सध्या ३५ वर्षाच्या आहेत.

सुरेखा कुडची – सुरेखा कुडची या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म १७ जुलै १९८१ मध्ये झाला आहे त्या सध्या ४० वर्षांच्या आहेत.

अक्षय वाघमारे – अक्षय वाघमारे देखील या शोमध्ये सहभागी झाला आहे. त्याचे वय ३७ वर्षे आहे त्याचा जन्म ५ ऑगस्ट १९८६ मध्ये झाला आहे.

मीनल शहा – मीनल शहाचा जन्म ८ एप्रिल १९८२ मध्ये झाला आहे. सध्या ती ३९ वर्षांची आहे.

संतोष चौधरी – संतोष चौधरी दादूस या नावाने लोकप्रिय आहेत. ते सुप्रसिद्ध गायक आहेत. संतोष चौधरी यांचे वय सध्या ४३ वर्षे आहे. घरात वयाने सर्वात मोठे दादूस आहेत.

Web Title: Bigg Boss Marathi 3: Gayatri Datar is not youngest member in the bigg boss house, know the age of all members