Bigg Boss 13: ब्रेकअपबाबत पारसनं केला मोठा खुलासा, आता गर्लफ्रेंडने सांगितलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 18:39 IST2019-10-11T18:38:47+5:302019-10-11T18:39:34+5:30
पारसने बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच आपल्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं.

Bigg Boss 13: ब्रेकअपबाबत पारसनं केला मोठा खुलासा, आता गर्लफ्रेंडने सांगितलं सत्य
बिग बॉसच्या तेराव्या सीझनला सुरूवात होऊन काही दिवस उलटले आहेत आणि हा शो सातत्याने चर्चेत येत असते. पहिल्याच एपिसोडमध्ये पारस छाब्राची शहनाज गिल व माहिरा शर्मासोबत जवळीकता पहायला मिळाली. यादरम्यान शॉकिंग गोष्टी समोर आल्या की पारसची गर्लफ्रेंडदेखील आहे. त्यात आता त्याने बिग बॉसच्या घरात पहिल्यांदा आपल्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं.
पारस घरात दिलजीत आणि आरतीशी बोलत असताना आपल्या गर्लफ्रेंडबद्दल सांगतात. पारस म्हणाला की, त्याला आकांक्षासोबत ब्रेकअप करायचे आहे. पण ती खूप इमोशनल आहे त्यामुळे तिच्याशी संबंध तोडता येत नाही. त्यानंतर पारसने सांगितले की, आमच्या दोघांमध्ये प्रेम आहे पण आम्ही दोघे एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत. मी जेव्हा आकांक्षाशी ब्रेकअपबद्दल बोलतो तेव्हा ती रडू लागते.
बिग बॉसच्या घरात पारसने आकांक्षाबद्दल केलेल्या वक्तव्यावर आकांक्षा पुरीने रिएक्शन दिली आहे. एका एण्टरटेन्मेंट वेबसाईटशी बोलताना आकांक्षा म्हणाली की, हे खूप धक्कादायक होते. हे ऐकून मी खूप डिस्टर्ब झाले आहे. मी अशी व्यक्ती नाही की मी ऐकून रडू लागेन. मी खूप स्ट्राँग व्यक्ती आहे आणि मी नेहमी पारसला सपोर्ट केला आहे. जे लोक मला व पारसला ओळखतात त्यांना मी कशी आहे हे माहित आहे.
आकांक्षाने पुढे सांगितले की, माझे कुटुंब व मित्रांचे सातत्याने फोन येत आहेत.पण ही खूप चांगली बाब आहे की कोणी मला प्रश्न विचारत नाही आहेत. पारसचे मित्र त्याच्या गोष्टींकडे जास्त गांभीर्याने नाही पाहत. ते बोलले की, यार तो काहीही बोलतो ते थोडासे कन्वेसिंग वाटते. इतकंच नाही तर माझे फ्रेंड मला म्हणाले की आकांक्षा तू अशी अजिबात नाही आहेस, तू जगाला रडवशील, तू रडणाऱ्यांपैकी आहेस, असं आम्हाला वाटत नाही. मला माहित नाही पारस असं का म्हणतो आहे कदाचित हा गेम असेल.
पारससोबतच्या लग्नाबद्दल आकांक्षाला विचारल्यावर तिने सांगितलं की, मी त्याला सांगितलं की आधी शो पूर्ण कर. लग्नाबद्दल नंतर बोलू शकतो. मात्र त्याचं म्हणणं होतं की लग्नाबाबत डिस्कशन आता का नको. तुझा दुसरा कोणता प्लान नसेल, अशी मला आशा आहे. आम्ही अशाच गोष्टी बोलत होतो.