‘बिग बॉस 10’चा पैसा ‘बीर्इंग ह्युमन’ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 17:05 IST2016-07-04T11:35:25+5:302016-07-04T17:05:25+5:30

सलमान खान त्याच्या वादांमुळे चर्चेत राहतो खरा. पण चॅरिटीमुळे तो अनेकांची मने जिंकतो, हेही खरे. आता चॅरिटी संदर्भातील एक ...

'Bigg Boss 10' to 'Bending Human'? | ‘बिग बॉस 10’चा पैसा ‘बीर्इंग ह्युमन’ला?

‘बिग बॉस 10’चा पैसा ‘बीर्इंग ह्युमन’ला?

मान खान त्याच्या वादांमुळे चर्चेत राहतो खरा. पण चॅरिटीमुळे तो अनेकांची मने जिंकतो, हेही खरे. आता चॅरिटी संदर्भातील एक नवी गोष्ट आमच्या कानावर आली आहे. ती म्हणजे, यंदा ‘बिग बॉस 10’ होस्ट करण्यासाठी सलमान म्हणे कमी फीस घेणार आहे. अर्थात तेही एका अटीवर. कलर्सने ‘बिग बॉस 10’च्या फीचा एक मोठा भाग सलमानच्या ‘बीर्इंग ह्युमन’ या ट्रस्टसाठी देणगी म्हणून द्यावा,असे सलमानने म्हणणे आहे.  ‘बिग बॉस 9’च्या प्रत्येक एपिसोडसाठी सलमानने म्हणे ७ ते ८ कोटी रुपए फी घेतल्याचे समजते.  खरे तर ‘बिग बॉस ’ होस्ट करणार नाही, असा निर्णय सलमानने घेतला होता. पण इतकी फी म्हटल्यावर त्याला आपला निर्णय बदलावा लागला होता. आता सलमानचा हा नवा फी प्लान कलर्स वाहिनी मान्य करते वा नाही, हे बघूच!

Web Title: 'Bigg Boss 10' to 'Bending Human'?