इंडियन आयडॉलमधील 'या' स्पर्धकाचा फॅन आहे आयुषमान खुराणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 08:00 IST2018-10-15T13:11:15+5:302018-10-16T08:00:00+5:30

आयुषमान खुराणा आपला आगामी सिनेमा 'बधाई हो'च्या प्रमोशनसाठी इंडियन आयडॉल 10च्या मंचावर आला होता.  आयुषमानसोबत सिनेमाचा दिग्दर्शक अमित शर्मासुद्धा आला होता

 Ayushman Khurana is the fan of 'This' Contest in Indian Idol | इंडियन आयडॉलमधील 'या' स्पर्धकाचा फॅन आहे आयुषमान खुराणा

इंडियन आयडॉलमधील 'या' स्पर्धकाचा फॅन आहे आयुषमान खुराणा

ठळक मुद्देआयुष्यमान आणि नीना गुप्ता यांच्याबरोबरच सान्या मल्होत्राही झळकणार आहे

आयुषमान खुराणा आपला आगामी सिनेमा 'बधाई हो'च्या प्रमोशनसाठी इंडियन आयडॉल 10च्या मंचावर आला होता.  आयुषमानसोबत सिनेमाचा दिग्दर्शक अमित शर्मासुद्धा आला होता. जेव्हा सलमान अली, हरियाणातील संगीत वाजपेयी, जो शोमध्ये उपस्थित असलेल्या पाहुण्यांसह जज आणि प्रेक्षकांना प्रभावित केले.  प्रतिभावान गायकांच्या वाढत्या फॅन बेसमध्ये सामील होणारा दुसरा कोणी नसून आयुषमान खुरानच आहे. 'जय माता दी' या सलमानच्या गाण्याने अभिनेता आश्चर्यचकित झाला. जेव्हा त्यांने सलमानाला 'जय माता दी' गाताना ऐकले तेव्हा त्याला प्रत्येक्ष वैष्णोदेवीला आल्यासारखे वाटले.

आयुषमान खुराणा म्हणाले,''मी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असताना वैष्णोदेवीला गेलो आणि मी प्रार्थना केली की जेव्हा मी यशस्वी अभिनेता बनेल तेव्हा मी परत येईल. पण चित्रपट रिलीझ पूर्वी मी तिथे गेलो आणि पुन्हा आशीर्वाद घेतला. आज आपली कामगिरी ऐकल्यानंतर मला त्या ठिकाणी परत आल्यासारखे वाटले. आपण अविश्वसनीय आहात आणि हे आश्चर्यजनक आहे.'' 

जंगली पिक्चर्स आणि क्रोम पिक्चर्सच्या बॅनरखालील विनित जैन, अलिया सेन, हेमंत भंडारी आणि अमित शर्मा यांची निर्मिती असलेल्या ‘बधाई हो’ हा सिनेमा१९ आॅक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होता मात्र आता तो एक दिवस आधीच रिलीज होणार  आहे. आयुष्यमान आणि नीना गुप्ता यांच्याबरोबरच सान्या मल्होत्राही झळकणार आहे. विनोदी धाटणीचा कौटुंबिक चित्रपट म्हणून प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहे.

Web Title:  Ayushman Khurana is the fan of 'This' Contest in Indian Idol