खिचडी मालिका परत येणार प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 16:05 IST2017-10-30T10:35:50+5:302017-10-30T16:05:50+5:30

खिचडी या मालिकेतील हॅलो हाऊ आर खाना खाके जाना हा... हा सुप्रिया पाठकचा संवाद चांगलाच गाजला होता. तसेच प्रफुल्लचे ...

The audience will return to the Khoshdi series | खिचडी मालिका परत येणार प्रेक्षकांच्या भेटीस

खिचडी मालिका परत येणार प्रेक्षकांच्या भेटीस

चडी या मालिकेतील हॅलो हाऊ आर खाना खाके जाना हा... हा सुप्रिया पाठकचा संवाद चांगलाच गाजला होता. तसेच प्रफुल्लचे हंसाला इंग्रजी भाषेचा हिंदीत अर्थ समजावणे हे प्रेक्षकांना चांगलेच रुचले होते. खिचडी ही मालिका संपून अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेतील हंसा, प्रफुल्ल, जयश्री, बाऊजी, राजू, मेलिसा, चक्की, जॅकी, भावेश कुमार या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. खिचडी या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेवर खिचडी नावाचा चित्रपट देखील बनवण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. आता ही प्रेक्षकांची आवडती मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. 
खिचडी ही मालिका २००२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेने जवळजवळ दोन वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ही मालिका संपल्यानंतर २००५ मध्ये याच मालिकेची संपूर्ण टीम घेऊन निर्माते जे.डी.मजेठिया आणि आतिश कपाडिया यांनी इन्स्टंट खिचडी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणली होती. आता या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. मुंबई मिरर या वर्तमानपत्राच्या बातमी नुसार खिचडी या मालिकेच्या चित्रीकरणाला गेल्या शुक्रवारपासून पुन्हा सुरुवात देखील झाली आहे. बाबूजींच्या भूमिकेत असलेले अनंत देसाई, प्रफुल्लच्या भूमिकेत असलेला राजीव मेहता, हंसाच्या भूमिकेत असलेली सुप्रिया पाठक आणि जयश्रीच्या भूमिकेत असलेले वंदना पाठक या सिझनमध्ये देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. आतिश कपाडिया गेल्या कित्येक दिवसांपासून या मालिकेच्या पटकथेवर काम करत असल्याचे म्हटले जात आहे. 
खिचडी या मालिकेत आपल्याला पारेख कुटुंबात घडत असलेली धमाल मस्ती पाहायला मिळाली होती. या कुटुंबातील हंसा आणि प्रफुल्ल यांची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. हा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस केव्हा येणार आणि या सिझनमध्ये कोण कोण व्यक्तिरेखा प्रेक्षकांना पाहायला मिळणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. 

Also Read : या अभिनेत्रीसह काम करण्याची झिनल बेलाणीची इच्छा

Web Title: The audience will return to the Khoshdi series