​अर्जुन कपूरने घेतला लिटल चॅम्प शण्मुखप्रियाचा ऑटोग्राफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 14:28 IST2017-05-05T08:58:43+5:302017-05-05T14:28:43+5:30

सारेगमपा हा रिअॅलिटी शो सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. आता या स्पर्धेत अंतिम दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली ...

Arjun Kapoor took the autograph of Little Champ Shankarpriya | ​अर्जुन कपूरने घेतला लिटल चॅम्प शण्मुखप्रियाचा ऑटोग्राफ

​अर्जुन कपूरने घेतला लिटल चॅम्प शण्मुखप्रियाचा ऑटोग्राफ

रेगमपा हा रिअॅलिटी शो सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. आता या स्पर्धेत अंतिम दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली असून यातून कोण बाजी मारणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमात नेहमीच अनेक कलाकार आपल्याला सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आलेले पाहायला मिळतात. आता पुढील भागात या कार्यक्रमात श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर हजेरी लावणार आहेत. ते या कार्यक्रमात हाफ गर्लफ्रेंड या त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत. त्या दोघांना या कार्यक्रमातील सगळ्या स्पर्धकांचे आवाज प्रचंड आवडले. अर्जुन कपूर तर या कार्यक्रमातील एका स्पर्धकाच्या आवाजाच्या प्रेमातच पडला होता. विशाखापट्टणच्या शण्मुखप्रियाचा आवाज खूपच चांगला आहे. ती नेहमीच दमदार परफॉर्मन्स सादर करते. शण्मुखप्रियाचा आवाज ऐकून तो तिचा फॅनच झाला. एवढेच नव्हे तर त्याने स्टेजवर जाऊन तिचा ऑटोग्राफ घेतला आणि तिच्यासोबत फोटोदेखील काढला. कोणालाही ऑटोग्राफ देण्याची शण्मुखप्रियाची ही पहिलीच वेळ होती. तिने अर्जुनच्या इश्कजादे या चित्रपटातील गाणे गायले. हे गाणे ऐकून अर्जुन थक्कच झाला होता. या गाण्याविषयी अर्जुन सांगतो, मला शण्मुखप्रियामध्ये एक स्टार दिसतेय. भविष्यात लोक तिचा ऑटोग्राफ घेण्यासाठी धडपडतील अशी मला खात्री आहे. 
श्रद्धालादेखील या कार्यक्रमातील स्पर्धकांचा आवाज प्रचंड आवडला होता. आशिकी 2 या चित्रपटातील सुन रहा है ना तू हे गाणे सोनाक्षीने गायल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. एवढ्या लहान वयातही तिच्या गाण्यात सुंदर भावना होत्या. सोनाक्षीचे हे गाणे ऐकल्यावर श्रद्धाने तिला या गाण्यासाठी बक्षीसदेखील दिले. 

Web Title: Arjun Kapoor took the autograph of Little Champ Shankarpriya