अंकिता लोखंडेच्या घरी हलणार पाळणा, 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर सांगितली गुडन्यूज, म्हणाली - "मी प्रेग्नेंट आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:58 IST2025-06-26T13:58:20+5:302025-06-26T13:58:42+5:30

Ankita Lokhande And Vicky Jain: अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सध्या चर्चेत आले आहे. दोघेही सध्या लाफ्टर शेफ या शोमध्ये दिसत आहेत.

Ankita Lokhande is Pregnant? she announced the good news on the sets of 'Laughter Chef', saying - ''I am pregnant...'' | अंकिता लोखंडेच्या घरी हलणार पाळणा, 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर सांगितली गुडन्यूज, म्हणाली - "मी प्रेग्नेंट आहे..."

अंकिता लोखंडेच्या घरी हलणार पाळणा, 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर सांगितली गुडन्यूज, म्हणाली - "मी प्रेग्नेंट आहे..."

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अंकिता तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे लग्न विकी जैन(Vicky Jain)शी झाले आहे. अंकिताचा पती विकी जैन देखील सध्या चर्चेत आहे. दोघेही सध्या 'लाफ्टर शेफ' (Laughter Chef Show) या शोमध्ये दिसत आहेत. शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अंकिता एक आनंदाची बातमी देताना दिसत आहे.

कृष्णा अभिषेक अंकिताकडून एक पदार्थ हिसकावून घेतो. अंकिता तो घेण्यासाठी त्याच्या मागे धावते. धावताना अंकिता म्हणताना दिसतेय की, 'मी प्रेग्नेंट आहे आणि मी पळू शकत नाही.' हे ऐकून सर्वजण चकीत झाले. कृष्णा अभिषेक विचारतो - खरंच? त्यावर अंकिता हसायला लागते. मग कृष्णा अभिषेक एक गाणे गातो की, आज हमारे घर में आ रहा लल्ला है. हे ऐकून करण कुंद्रा देखील आश्चर्यचकित होतो.


आता अंकिता लोखंडेच्या विधानात किती तथ्य आहे, हे एपिसोड आल्यावर कळेल. कारण याआधी एकदा अंकिताने लॉकअप शोमध्ये तिच्या प्रेग्नेंसीबद्दल प्रँक केला होता. कलर्स टीव्हीने हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, 'अंकिताने लाफ्टर शेफला गोंधळात टाकले. जेव्हा तिने एक खास बातमी दिली.'

२०२१ मध्ये अंकिताने विकीसोबत बांधली लग्नगाठ

अंकिताने डिसेंबर, २०२१ रोजी बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले. त्यांचे भव्य लग्न खूप चर्चेत होते. लग्नानंतर अंकिता तिच्या पतीसोबत रिएलिटी शोमध्ये सहभागी होताना दिसत आहे. विकी आणि अंकिता स्मार्ट जोडी या शोमध्ये सहभागी झाले होते. ते या शोचे विजेते ठरले. यानंतर दोघेही बिग बॉसमध्ये दिसले. आता ते लाफ्टर शेफ २ मध्ये पाहायला मिळत आहेत.

Web Title: Ankita Lokhande is Pregnant? she announced the good news on the sets of 'Laughter Chef', saying - ''I am pregnant...''