घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान योगिता-सौरभ पहिल्यांदाच दिसले कॅमेऱ्यासमोर! व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 10:27 IST2025-10-31T10:20:51+5:302025-10-31T10:27:10+5:30
आधी घटस्फोटाची चर्चा नंतर रेडकार्पेटवर एकत्र, योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेचा व्हिडीओ बघाच

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान योगिता-सौरभ पहिल्यांदाच दिसले कॅमेऱ्यासमोर! व्हिडीओ होतोय व्हायरल
Yogita Chavan And Saurabh Chaughule: 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली जोडी म्हणजे सौरभ चौघुले आणि योगिता चव्हाण. ऑनस्क्रिन केमिस्ट्रीदरम्यान त्यांचे खऱ्या आयुष्यात सूर जुळले. छोट्या पडद्यावरील ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली आणि त्यांनी ३ मार्च २०२४ रोजी त्यांनी लग्न केलं. मात्र,लग्नानंतर अवघ्या दीड वर्षात त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे चाहते देखील प्रचंड नाराज झाले होते. त्यात आता एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा असताना सौरभ आणि योगिता पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आल्याचं पाहायला मिळतंय. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वत्र योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या घटस्फोटाबद्दलची चर्चा आहे. अशातच नुकताच महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमाचा प्रिमिअर पार पडला. या प्रिमिअरला मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.दरम्यान,या प्रिमिअरला सौरभ आणि योगिता दोघेही उपस्थित होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. घटस्फोटाच्या बातम्यांनंतर योगिता-सौरभ एकाच रेडकार्पेटवर पाहायला मिळाले. त्यामुळे अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आहेत. आधी घटस्फोटाच्या चर्चा आणि नंतर एकाच कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र दिसल्याने योगिता-सौरभच्या चाहत्यांनी भलतेच अंदाज बांधले आहेत. यामुळे ही जोडी पुन्हा एकत्र येणार का अशी आशा चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. 'कलाकट्टा' नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये योगिता-सौरभला एकत्र पाहून एका चाहत्यांनी," घटस्फोट घेऊ नका…" अशा कमेंट्स देखील केल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?
दीड वर्षांच्या सुखी संसारानंतर योगिता आणि सौरभमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा काही दिवसांपासून जोर धरू लागल्या होत्या. याचं कारण म्हणजे योगिता- सौरभने त्यांचे इन्स्टाग्रामवरील हटवले आहेत. शिवाय दोघांनाही एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे अनेक-तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. एकूणच त्यांचा सोशल मीडियावरील वावर पाहता ते एकत्र नसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याबाबत अद्याप योगिता किंवा सौरभ दोघांपैकी कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
