​ऐश्वर्या सखुजा दिसणार साराभाई व्हर्सेस साराभाईमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 15:26 IST2017-05-05T09:56:14+5:302017-05-05T15:26:14+5:30

साराभाई व्हर्सेस साराभाई या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. या कार्यक्रमातील मोनिषा, इंद्रवधन, साहिल, रोसेश, माया साराभाई या सगळ्याच ...

Aishwarya Sakhuja will appear in Sarabhai Varses Sarabhai | ​ऐश्वर्या सखुजा दिसणार साराभाई व्हर्सेस साराभाईमध्ये

​ऐश्वर्या सखुजा दिसणार साराभाई व्हर्सेस साराभाईमध्ये

राभाई व्हर्सेस साराभाई या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. या कार्यक्रमातील मोनिषा, इंद्रवधन, साहिल, रोसेश, माया साराभाई या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रसिद्ध झाल्या होत्या. या मालिकेत रत्ना पाठक शहा, सतिश शहा, सुमीत राघवन, राजेश कुमार, रुपाली गांगुली, देवेन भोजानी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या कार्यक्रमाची लोकप्रियता पाहाता या कार्यक्रमाचा दुसरा सिझन यावा यासाठी या कार्यक्रमाचे फॅन्स गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन तब्बल दहा वर्षांनंतर परतत असून आता तो वेबसिरिजच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या सिझनमध्ये देखील हेच कलाकार प्रेक्षकांना प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. पण त्याचसोबत काही नवीन कलाकार देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या नव्या सिझनमध्ये साहिल आणि मोनिषा यांना मुलगा असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे 
या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये सोनिया साराभाई ही व्यक्तिरेखा काही दिवस क्षिती जोग तर काही दिवस शितल ठक्करने साकारली होती. सोनिया ही माया आणि इंद्रवधनची मुलगी असल्याचे आपल्याला दाखवण्यात आले होते. या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये देखील प्रेक्षकांना सोनिया ही व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे. पण यावेळी ही व्यक्तिरेखा प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या सखुजा साकारणार आहे. ऐश्वर्याने याआधी सास बिना ससुराल, मैं ना भुलूंगी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. सध्या ती त्रिदेवियाँ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ऐश्वर्याची जोडी देवेन भोजानीसोबत झळकणार आहे. ऐश्वर्या या मालिकेचा भाग व्हायला खूप उत्सुक असल्याचे कळतेय. 

Web Title: Aishwarya Sakhuja will appear in Sarabhai Varses Sarabhai