'बिग बॉस मराठी'च्या घरात होऊ शकते या कलाकार मंडळींची Entry

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 14:20 IST2019-05-08T14:19:51+5:302019-05-08T14:20:26+5:30

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो 'बिग बॉस मराठी'चे दुसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसच्या घरात कोण कोण जाणार आहेत, याची संभाव्य यादी समोर आली आहे.

The actors can be in the house of 'Big Boss Marathi' | 'बिग बॉस मराठी'च्या घरात होऊ शकते या कलाकार मंडळींची Entry

'बिग बॉस मराठी'च्या घरात होऊ शकते या कलाकार मंडळींची Entry

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो 'बिग बॉस'चा मराठीमध्ये गेल्या वर्षी रसिकांच्या भेटीला आले. या पर्वाला रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या शोचा दुसरे पर्व लवकरच भेटीला येणार आहे. या पर्वात कोण कोण कलाकार मंडळी सहभागी होणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोंमधून लोकांना हिंट देण्यात आली आहे. मात्र बिग बॉसच्या घरात कोण कोण जाणार आहेत याची संभाव्य यादी समोर आली आहे.


एबीपी माझा वृत्त वाहिनीने 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांची संभाव्य यादी सांगितली आहे. या यादीत त्यांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेता मिलिंद शिंदे, कवी मनाचे नेते म्हणून प्रचलित असलेले अभिजीत बिचुकले, अभिनेत्री रसिका सुनील, अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री मनवा नाईक, अभिनेत्री केतकी चितळे किंवा गायिका केतकी माटेगांवकर, टिकटॉक गर्ल अभिनेत्री अमृता देशमुख, अभिनेता दिगंबर नाईक, अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, अभिनेत्री नेहा पेंडसे किंवा नेहा गद्रे किंवा नेहा शितोळे ही नावे चर्चेत आहेत.

या यादीत महिला किर्तनकाराचाही समावेश आहे. ही नावे जरी समोर आली असली तरी अधिकृतरित्या ही नावे कन्फर्म नाहीत. 


'बिग बॉस'च्या घरात सर्व स्पर्धक १४ मे रोजी दाखल होणार आहे.

त्यानंतर १७ मे रोजी या शोच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे आणि १९ मे पासून बिग बॉस मराठी २ रसिकांच्या भेटीला होणार आहे.

Web Title: The actors can be in the house of 'Big Boss Marathi'