असं वाटतंय तुझा वाढदिवस आहे... श्रेया बुगडेच्या पोस्टवरील अभिनेता सौरभ गोखलेची कमेंट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 05:13 PM2022-11-02T17:13:53+5:302022-11-02T18:09:35+5:30

शाहरुखला शुभेच्छा देताना श्रेयाने त्याच्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.

Actor Saurabh Gokhal's comment on Shreya Bugdene's post | असं वाटतंय तुझा वाढदिवस आहे... श्रेया बुगडेच्या पोस्टवरील अभिनेता सौरभ गोखलेची कमेंट चर्चेत

असं वाटतंय तुझा वाढदिवस आहे... श्रेया बुगडेच्या पोस्टवरील अभिनेता सौरभ गोखलेची कमेंट चर्चेत

googlenewsNext

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान ( Shahrukh Khan) याचा आज वाढदिवस. जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. ‘फौजी’ या मालिकेद्वारे शाहरुखची वाटचाल सुरु झाली. त्यानंतर शाहरूख सिनेमात आला आणि सिनेमाच्या दुनियेचा सुपरस्टार झाला. राजू बन गया जेंटलमन आणि फिर भी दिल है हिंदुस्तानी, डुप्लिकेट, देवदास, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, माय नेम इज खान आणि चक दे सारख्या चित्रपटांमधून शाहरूख घराघरात पोहोचला.

शाहरूखच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी ‘मन्नत’ बाहेर प्रचंड गर्दी केली. मंगळवारी रात्रीपासूनचं ‘मन्नत’ बाहेरच्या रस्त्यावर शेकडो लोक जमले. सोशल मीडियावरही शाहरुख खानला त्याचे चाहते शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडेने ही किंग खानची चाहती आहे तिने ही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखला शुभेच्छा देताना श्रेयाने त्याच्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. यावर चाहत्यांनी देखील कमेंट्स केल्या आहेत. पण अभिनेता सौरभ गोखलेच्या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या सगळ्या फोटोत वाढदिवस तुझा आहे असं वाटतंय, अशी कमेंट त्याने केलीय. 

चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून श्रेया बुगडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. श्रेयाच्या कॉमेडीचे आणि तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. यशोमुळे श्रेयाला अफाट प्रसिद्धी मिळाली आहे. श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे. अगदी कमी वयात अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणा-या श्रेयानं नाटक, टीव्ही या माध्यमांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘तू तिथे मी’, ‘अस्मिता’, ‘फू बाई फू’ अशा मालिकांमधून श्रेयाने मराठी रसिकांवर जादू केली आहे. मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेतही नाटकं सादर केली आहेत.

Web Title: Actor Saurabh Gokhal's comment on Shreya Bugdene's post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.