'एक नंबर तुझी कंबर...'वर थिरकली अभिजीत सावंतची लेक, स्विर्त्झलँडच्या रस्त्यावर केला भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:51 IST2025-06-18T12:51:26+5:302025-06-18T12:51:41+5:30

लोकप्रिय गायक अभिजीत सावंतची लेकही 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर थिरकली आहे.

abhijeet sawant daughter dance on ek no tuzi kambar viral song video | 'एक नंबर तुझी कंबर...'वर थिरकली अभिजीत सावंतची लेक, स्विर्त्झलँडच्या रस्त्यावर केला भन्नाट डान्स

'एक नंबर तुझी कंबर...'वर थिरकली अभिजीत सावंतची लेक, स्विर्त्झलँडच्या रस्त्यावर केला भन्नाट डान्स

सोशल मीडियावर सध्या 'एक नंबर तुझी कंबर' हे गाणं ट्रेंडिंग आहे. गुलाबी साडीनंतर संजू राठोडच्या या गाण्याने सगळ्यांना वेड लावलंय. शॅकी शॅकी या गाण्यातील 'एक नंबर तुझी कंबर' हे लिरिक्स चाहत्यांच्या मनाला भावले आहेत. कित्येकांनी 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर रील्स बनवल्या आहेत. काही सेलिब्रिटींनाही या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. 

आता लोकप्रिय गायक अभिजीत सावंतची लेकही 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर थिरकली आहे. अभिजीत सध्या त्याच्या कुटुंबीयांसह स्विर्त्झलँडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. कुटुंबीयांसोबत अभिजीत धमाल करताना दिसत आहे. स्विर्त्झलँडमध्ये अभिजीतच्या लेकीने 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये तिने 'एक नंबर तुझी कंबर' गाण्याच्या हुकस्टेप्स केल्या आहेत. लेकीचा हा रील व्हिडिओ अभिजीतच्या पत्नीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. 


या व्हिडिओवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत अभिजीतच्या लेकीचं कौतुक केलं आहे. संजू राठोडनेही या व्हिडिओवर कमेंट केली आहे. "Cutiee" असं त्याने कमेंट करत म्हटलं आहे. संजय राठोडचं 'एक नंबर तुझी कंबर' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं आहे. या गाण्याला युट्यूबवर ११२ मिलियनेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 

Web Title: abhijeet sawant daughter dance on ek no tuzi kambar viral song video