'बघितलं पोरी तुला पहिल्यांदा...'; ऐश्वर्याला पाहून अशी झाली अविनाश नारकरांची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 01:28 PM2023-10-30T13:28:22+5:302023-10-30T13:28:44+5:30

Avinash narkar: २७ वर्षांपूर्वी अविनाश नारकर ऐश्वर्याच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी तिला पाहताच त्यांच्या मनाची अवस्था कशी झालेली हे त्यांनी सांगितलं.

27 years ago this was the situation of Avinash Narkar when he saw Aishwarya | 'बघितलं पोरी तुला पहिल्यांदा...'; ऐश्वर्याला पाहून अशी झाली अविनाश नारकरांची अवस्था

'बघितलं पोरी तुला पहिल्यांदा...'; ऐश्वर्याला पाहून अशी झाली अविनाश नारकरांची अवस्था

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणजे ऐश्वर्या नारकर (aishwarya narkar)आणि अविनाश नारकर (avinash narkar). कलाविश्वात सक्रीय असलेली ही जोडी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर त्यांची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते. या जोडीचं लव्हमॅरेज असून ते कायम एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करत असतात. यात अलिकडेच अविनाश यांनी एक छानसा व्हिडीओ शेअर केला आहे.

अविनाश नारकर कायम त्यांच्या हटके रिल्स आणि व्हिडीओमुळे चर्चेत येत असतात. परंतु, यावेळी त्यांनी ऐश्वर्या यांच्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला. सोबतच २७ वर्षांपूर्वी जेव्हा ऐश्वर्याला पाहिलं त्यावेळी त्यांच्या मनाची अवस्था कशी झाली होती हे सुद्धा सांगितलं.

"It's been 27years ... Time flies.... just create memories.. enjoy life... मीही ऐश्वर्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हां माझंही असंच काहीसं झालं होतं.....!! आईशप्पथ....!!", असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

दरम्यान, अविनाश नारकर यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्यामागे ऐश्वर्या यांचे काही फोटो दिसून येत आहेत. सोबतच 'बघितलं पोरी तुला पहिल्यांदा' हे गाणं सुरु असल्याचं दिसून येत आहे.

Web Title: 27 years ago this was the situation of Avinash Narkar when he saw Aishwarya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.