सुशांत शेलारने केले क बड्डीचे आयोजन

By Admin | Updated: March 13, 2016 21:11 IST2016-03-13T21:11:51+5:302016-03-13T21:11:51+5:30

दुनियादारी, क्लासमेट, वंंशवेल यासारख्या चित्रपटांमध्ये आपल्या कसदार अभिनयाने सर्वांच्याच लक्षात राहिलेल्या सुशांत शेलार या हरहुन्नरी अभिनेत्याने मराठमोळ्या मातीतल्या खेळासाठी पुढाकार घेतला

Sushant Shelar made the arrangement for the boy | सुशांत शेलारने केले क बड्डीचे आयोजन

सुशांत शेलारने केले क बड्डीचे आयोजन

दुनियादारी, क्लासमेट, वंंशवेल यासारख्या चित्रपटांमध्ये आपल्या कसदार अभिनयाने सर्वांच्याच लक्षात राहिलेल्या सुशांत शेलार या हरहुन्नरी अभिनेत्याने मराठमोळ्या मातीतल्या खेळासाठी पुढाकार घेतला आहे. वडील उत्तम कबड्डीपटू असल्यामुळे या खेळाशी त्याची नाळ जोडली गेलेली आहे. त्यांच्याच स्मरणार्थ उमद्या व नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठीच या स्पर्धेचे आयोजन शेलार मामा फाउंडेशनतर्फे सुशांत शेलारने केले आहे. हे सामने १६ ते २० मार्चदरम्यान गिरणगावात होणार आहेत. या सामन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे सामने ब वर्ग खेळाडूंसाठी आयोजित केले जाणार आहेत. श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल डीलाइल रोड मुंबई येथे हे सामने रंगणार आहेत.

Web Title: Sushant Shelar made the arrangement for the boy