रॉकिंग स्टार यशचा 'टॉक्सिक' चित्रपट 'रामायण'मुळे पुढे ढकलला जाणार? निर्मात्यांनी दबाव टाकल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 14:53 IST2026-05-15T14:50:09+5:302026-05-15T14:53:14+5:30

यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? वाचा सविस्तर...

Yash Toxic Delay Rumours Ramayana Release Update | रॉकिंग स्टार यशचा 'टॉक्सिक' चित्रपट 'रामायण'मुळे पुढे ढकलला जाणार? निर्मात्यांनी दबाव टाकल्याची चर्चा

रॉकिंग स्टार यशचा 'टॉक्सिक' चित्रपट 'रामायण'मुळे पुढे ढकलला जाणार? निर्मात्यांनी दबाव टाकल्याची चर्चा

'रॉकिंग स्टार' यश मोठ्या पडद्यावर कधी परतणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. सध्या यश दोन मोठ्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. त्यापैकी एक म्हणजे 'टॉक्सिक' आणि दुसरा 'रामायण'. मात्र, आता या दोन्ही चित्रपटांमुळे यश हा अडचणीत सापडल्याची चर्चा रंगली आहे.  

यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट सुरुवातीला १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, त्याच वेळी 'धुरंधर २' प्रदर्शित होत असल्याने आणि मध्य-पूर्वेतील तणावाचे कारण देत प्रदर्शनाची तारीख ४ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली. आता ताज्या वृत्तानुसार, 'रामायण'चे निर्माते यशवर 'टॉक्सिक'चे प्रदर्शन पुढच्या वर्षीपर्यंत पुढे ढकलण्यासाठी दबाव टाकत असल्याची चर्चा आहे. 'रामायण' चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. या चित्रपटात यश केवळ 'रावण' ही महत्त्वाची भूमिकाच साकारत नाही, तर तो या चित्रपटाचा सह-निर्माता देखील आहे.

'रामायण'च्या निर्मात्यांना असे वाटते की, जर यशचे दोन मोठे चित्रपट कमी अंतराने प्रदर्शित झाले, तर त्याचा फटका दोन्ही चित्रपटांच्या कमाईला बसू शकतो. काही काळापूर्वी रणबीर कपूरनेही आपला 'लव्ह अँड वॉर' चित्रपट याच कारणास्तव पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलला होता, जेणेकरून दोन चित्रपटांमध्ये पुरेसे अंतर राहील. आता जर यशनं 'टॉक्सिक' खरोखरच पुढच्या वर्षीपर्यंत पुढे ढकलला, तर चाहत्यांना आणखी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागेल. 

सध्या तरी 'टॉक्सिक' पुढील वर्षी जाणार की याच वर्षात रिलीज होणार, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र यशच्या चाहत्यांमध्ये या चर्चेमुळे उत्सुकता चांगलीच वाढली आहे. 'टॉक्सिक'चे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांनी केलं आहे. या चित्रपटात यशसोबत नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, हुमा कुरेशी आणि रुक्मिणी वसंत या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

Web Title : यश की 'टॉक्सिक' 'रामायण' के कारण स्थगित? अटकलें तेज।

Web Summary : रॉकिंग स्टार यश की 'टॉक्सिक' की रिलीज 'रामायण' के निर्माताओं के दबाव के कारण स्थगित हो सकती है, जिससे बॉक्स ऑफिस पर टकराव की आशंका है। यश सह-निर्माता और रावण की भूमिका निभाते हुए 'रामायण' दिवाली पर रिलीज करने का लक्ष्य है। प्रशंसकों को आधिकारिक पुष्टि का इंतजार है।

Web Title : Yash's 'Toxic' delayed due to 'Ramayana' pressure? Speculation swirls.

Web Summary : Rocking Star Yash's 'Toxic' release may be postponed due to pressure from 'Ramayana' producers, fearing box office clash. 'Ramayana' aims for Diwali release, with Yash co-producing and playing Ravan. Fans await official confirmation.