थिएटरमध्ये मोफत सिनेमा बघा आणि साडीही मिळवा! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या 'या' चित्रपटाची महिलांना खास ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 16:08 IST2025-10-31T15:59:27+5:302025-10-31T16:08:24+5:30
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाची महिलांना खास ऑफर असून त्यांना हा सिनेमा फ्रीमध्ये बघायला मिळणार आहे. सोबत साडीही मिळणार आहे

थिएटरमध्ये मोफत सिनेमा बघा आणि साडीही मिळवा! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या 'या' चित्रपटाची महिलांना खास ऑफर
साडी म्हणजे महिलांसाठी जिव्हाळ्याचा विषय. एका आगामी सिनेमाने महिलांना सिनेमाचं तिकिट आणि साडीही देण्याची खास ऑफर दिली आहे. त्यामुळे महिलांची या सिनेमाला गर्दी होणार यात शंका नाही. भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे (Amrapali Dubey) सध्या तिच्या 'मातृ देवो भवः' (Matru Devo Bhava) या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार असून, चित्रपटाच्या निर्मात्यांनी महिलांसाठी ही मोठी आणि अनोखी घोषणा केली आहे.
महिलांसाठी मोफत एन्ट्री आणि साडी
चित्रपटाचे निर्माते प्रदीप के. शर्मा यांनी 'मातृ देवो भवः' हा चित्रपट प्रदर्शित होणाऱ्या पहिल्या दिवशी महिलांसाठी पूर्णपणे मोफत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.निर्मात्यांनी सांगितलं की, 'मातृ देवो भवः' हा चित्रपट महिलांवर आणि त्यांच्या बलिदानावर आधारित असल्याने, त्यांनी पहिल्या दिवशी महिला प्रेक्षकांना चित्रपट मोफत पाहण्याची ऑफर ठेवली आहे एवढंच नव्हे, तर चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व महिलांमधून पाच महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून एक साडी भेट म्हणून दिली जाईल, अशी घोषणाही करण्यात आली आहे.
मातृ देवो भवः चित्रपटाबद्दल
'मातृ देवो भवः' हा एक कौटुंबिक आणि भावनिक चित्रपट असून, यात आम्रपाली दुबे मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट आईचे आपल्या मुलावरील प्रेम आणि तिच्या त्यागाची कथा सांगतो. निर्मात्यांना विश्वास आहे की, हा चित्रपट महिलांना खूप भावेल आणि त्यामुळे त्यांनी महिलांना विशेष सवलत आणि भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असून, या अनोख्या घोषणेमुळे भोजपुरी सिनेसृष्टीत उत्साह निर्माण झाला आहे.
