"सिनेमांमधला विजय अन् खऱ्या आयुष्यातला यात खूप फरक...", थलापतीच्या शिक्षिकेची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 10:48 IST2026-05-06T10:45:48+5:302026-05-06T10:48:34+5:30

थलापती विजयने अनेक सिनेमांमध्ये लार्जर दॅन लाईफ भूमिका साकारल्या. पण लहानपणी तो कसा होता?

thalapathy vijay was very good kid in childhood his teacher revealed about him | "सिनेमांमधला विजय अन् खऱ्या आयुष्यातला यात खूप फरक...", थलापतीच्या शिक्षिकेची प्रतिक्रिया

"सिनेमांमधला विजय अन् खऱ्या आयुष्यातला यात खूप फरक...", थलापतीच्या शिक्षिकेची प्रतिक्रिया

तमिळनाडू विधानसभा निवडणूकीत थलापती विजय आणि त्याच्या टीव्हीके पक्षाने कमाल केली. थलापतीचा निवडणूकीतील विजय हा ऐतिहासिक आहे. आज तो राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठीचा प्रमुख चेहरा आहे. थलापतीची सिनेमांमुळे सुरुवातीपासूनच प्रचंड लोकप्रियता होती. आता राजकारणातही त्याला तितक्याच संख्येने प्रेम मिळालं आहे. मात्र लहानपणी विजय नक्की कसा होता याचा उलगडा त्याच्या शाळेतील शिक्षिकेने केला आहे.

थलापती विजयने अनेक सिनेमांमध्ये लार्जर दॅन लाईफ भूमिका साकारल्या. नेहमी सभोवताली लोकांचा गराडा, प्रत्येक क्षण साजरा करणारा असा हिरो पडद्यावर दिसा. तर त्याचे जवळचे व्यक्ती कायम त्याला लाजाळू म्हणतात. राजकारणात येण्यापूर्वी तो सार्वजनिक ठिकाणी क्वचितच दिसायचा. आता तर त्याची शाळेतील शिक्षिका वासंथानेही याला दुजोरा दिला आहे. 

'गलाटा'शी बोलताना वासंथा म्हणाल्या, "विजयमध्ये लहानपणापासूनच लीडरशिप क्वॉलिटी होती. जेव्हाही सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन व्हायचं तेव्हा विजय आणि त्याच्या मित्रांवरच जबाबदारी दिली जायची. ते ही जबाबदारी छान पार पाडायचे. विजय खूप आज्ञाधारी, प्रामाणिक आणि इतरांना कायम मदत करणारा होता. कधी त्याला रागावलो जरी तरी तो कधीच चिडला नाही आणि ना ही त्याने कधी मनाला लावून घेतलं. तो माझा विद्यार्थी आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो."

त्याची लोकप्रियता पाहिल्यावर वासंथा म्हणतात, "एकदा एका कार्यक्रमात विजयच्या मावशीने मजुराशी माझी ओळख  विजयची शिक्षिका म्हणून करुन दिली होती. तेव्हा तो मजूर थेट माझ्यावर पायाच पडला. विजयची गुरु असं म्हटल्यावर मला कायम हा अनुभव येतो."

Web Title : विजय का फिल्मी और असली जीवन: शिक्षिका ने खोले बचपन के राज़।

Web Summary : थलपति विजय की राजनीतिक सफलता उनके शर्मीले, मददगार बचपन के विपरीत है। उनकी शिक्षिका उनकी नेतृत्व क्षमता, आज्ञाकारिता और दूसरों की मदद करने की इच्छा को याद करती हैं, जो उनके ऑन-स्क्रीन व्यक्तित्व और उनके वास्तविक स्वभाव के बीच अंतर को उजागर करती हैं।

Web Title : Vijay's reel vs real life: Teacher reveals childhood secrets.

Web Summary : Thalapathy Vijay's political success contrasts with his shy, helpful childhood. His teacher recalls his leadership qualities, obedience, and willingness to help others, highlighting the difference between his on-screen persona and his true nature.