अभिनेता विजयच्या संसारात वादळ, २७ वर्षांच्या सोबतीनंतर पत्नीने घटस्फोटासाठी केला अर्ज   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 18:00 IST2026-02-27T17:58:49+5:302026-02-27T18:00:05+5:30

Vijay Thalapathy News: दाक्षिणात्य चित्रपटसृ्ष्टीमधील सुपरस्टार आणि तामिळनाडूच्या राजकारणात नव्याने आलेल्या टीव्हीके पक्षाचा प्रमुख थलपती विजय याच्या संसारात वादळ आले आहे. विजयची पत्नी संगिता हिने २७ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर पती विजय याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

Storm in actor Vijay's marriage, wife files for divorce after 27 years of marriage | अभिनेता विजयच्या संसारात वादळ, २७ वर्षांच्या सोबतीनंतर पत्नीने घटस्फोटासाठी केला अर्ज   

अभिनेता विजयच्या संसारात वादळ, २७ वर्षांच्या सोबतीनंतर पत्नीने घटस्फोटासाठी केला अर्ज   

दाक्षिणात्य चित्रपटसृ्ष्टीमधील सुपरस्टार आणि तामिळनाडूच्या राजकारणात नव्याने आलेल्या टीव्हीके पक्षाचा प्रमुख थलपती विजय याच्या संसारात वादळ आले आहे. विजयची पत्नी संगिता हिने २७ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर पती विजय याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून, तिने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज सादर केला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार थलपती विजय याची पत्नी संगीता सोरनलिंगम हिने विशेष विवाह कायदा १९५४ मधील कलम २७(१)(अ) नुसार घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. विशेष विवाह कायदा १९५४ मधील कलम २७(१)(अ) मधील तरतुदीनुसार पती किंवा पत्नीपैकी कुणीही जिल्हा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकतो. याचा आधार प्रतिवादीने लग्नानंतर पती किंवा पत्नीशिवाय अन्य व्यक्तीसोबत स्वेच्छेने शरीरसंबंध ठेवणे हा असतो. हे व्यभिचारावर आधारित घटस्फोटाचे कारण आहे. तसेच ही तरतूद पती किंवा पत्नी यांच्यापैकी दोघांनाही समान रूपाने लागू आहे. तसेच ही याचिका कायद्यातील इतर तरतुदी आणि नियमांसी अधीन राहून दाखल केली जाते.

दरम्यान, अभिनेता विजय याने हल्लीच आपल्या टीव्हीके या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. तसेच त्याचा पक्ष यावर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची शक्यता आहे. तसेच राजकारणात सक्रिय झाल्यानंतर विजय याने अभिनयक्षेत्रातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. मी अभिनयातून निवृत्ती स्वीकारली असून, नेता म्हणून जनतेची सेवा करू इच्छितो, असे विजयने सांगितले होते.  

Web Title : अभिनेता विजय के वैवाहिक जीवन में तूफान; पत्नी ने तलाक के लिए अर्जी दी।

Web Summary : सुपरस्टार विजय का 27 साल का वैवाहिक जीवन संकट में, पत्नी संगीता ने विशेष विवाह अधिनियम के तहत तलाक की अर्जी दी। विजय ने हाल ही में एक राजनीतिक पार्टी शुरू की और पूरी तरह से जनसेवा के लिए समर्पित होने का इरादा है।

Web Title : Actor Vijay's marriage in turmoil; Wife files for divorce.

Web Summary : Superstar Vijay's 27-year marriage faces crisis as wife Sangeetha seeks divorce, citing irreconcilable differences under the Special Marriage Act. Vijay recently launched a political party and intends to fully dedicate himself to public service.