प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नी आणि सासूविरोधात केली पोलिसात तक्रार, प्रकरण नेमकं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 11:44 IST2025-05-29T11:44:06+5:302025-05-29T11:44:40+5:30

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने पत्नी आणि सासूविरोधात तक्रार दाखल केली असून न्यायालयात न्याय मागितला आहे. काय आहे नेमकं प्रकरण

actor ravi mohan files police complaint against wife and mother-in-law of defamation | प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नी आणि सासूविरोधात केली पोलिसात तक्रार, प्रकरण नेमकं काय?

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नी आणि सासूविरोधात केली पोलिसात तक्रार, प्रकरण नेमकं काय?

मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येतेय. ती म्हणजे तमिळ अभिनेता रवी मोहनने (ravi mohan) पत्नी आरती रवी आणि सासू सुजाता विजयकुमार यांच्याविरुद्ध बदनामीचा दावा दाखल केला आहे. रवीने मद्रास उच्च न्यायालयात सिव्हिल केस दाखल केली असून, सोशल मीडियावर त्याच्या विरोधात करण्यात आलेल्या बदनामीकारक पोस्ट्स हटवण्याची मागणी केली आहे. या पोस्ट्समुळे व्यावसायिक करिअरला आणि मानसिक आरोग्याला हानी पोहोचल्याचा आरोप अभिनेत्याने केला आहे. 

रवीने पत्नी आणि सासूविरोधात केली तक्रार

या प्रकरणात कोर्टाने रवी मोहन आणि त्याची पत्नी आरती रवी यांना एकमेकांविरुद्ध सार्वजनिकरित्या बदनामीकारक विधानं करण्यास मनाई केली आहे. या आदेशानंतर दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन संबंधित पोस्ट्स हटवल्या आहेत. रवी मोहन आणि आरती रवी यांचं १६ वर्षांचं लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. दोघांनीही चेन्नई कौटुंबीक न्यायालयातघटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी १२ जून २०२५ रोजी होणार आहे.


या प्रकरणात रवीची सासू सुजाता विजयकुमार यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "मी त्याला केवळ जावई म्हणून नाही, तर माझ्या स्वतःच्या मुलासारखं मानलं आहे," या कौटुंबीक वादामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. अनेकांनी अभिनेता रवीची बाजू घेऊन त्याला सपोर्ट केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर दोन्ही पक्षांनी सार्वजनिकरित्या विधानं करणं थांबवलं आहे, परंतु या प्रकरणाच्या पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष आहे. 

Web Title: actor ravi mohan files police complaint against wife and mother-in-law of defamation