मोंथा चक्रीवादळाचं सावट तरीही प्रसिद्ध अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 17:45 IST2025-11-02T17:42:46+5:302025-11-02T17:45:16+5:30
मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे

मोंथा चक्रीवादळाचं सावट तरीही प्रसिद्ध अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदन
दक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि अल्लू अर्जुनचा धाकटा भाऊ अल्लू सिरीश (Allu Sirish) याने आपल्या चाहत्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे. सिरीशने त्याची गर्लफ्रेंड नयनिका हिच्यासोबत साखरपुडा केला असून, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याने याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे. सिरीशच्या साखरपुड्यावर मोंथा चक्रीवादळाचं सावट होतं. त्यामुळे तो त्याचा साखरपुडा पुढे ढकलणार, अशी चर्चा होती. परंतु सिरीशने साखरपुडा केल्याने चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलंय.
सिरीशने गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा
अल्लू सिरीशने आपल्या सोशल मीडिया हँडलवर नयनिकासोबतचे साखरपुड्याचे फोटो शेअर करत एक सुंदर कॅप्शन लिहिलंय, "मी नयनिकासोबत साखरपुडा केलाय! ती माझ्या आयुष्यातील प्रेम आहे. आमच्या नवीन प्रवासासाठी तुमचे आशीर्वाद आणि प्रेम आवश्यक आहे." सिरीशने अत्यंत रोमँटिक पद्धतीने आपल्या नात्याची घोषणा केल्याने चाहते आणि सहकलाकारांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नयनिका कोण आहे?
नयनिका ही एक बिझनेसवुमन असून तिचा चित्रपटसृष्टीशी थेट संबंध नाही. अल्लू सिरीश आणि नयनिका एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत होते. मात्र, सिरीशने त्यांच्या नात्याबद्दल कधीही सार्वजनिकरित्या जास्त चर्चा केली नव्हती. आता थेट साखरपुड्याची बातमी दिल्यामुळे त्यांचे चाहतेही खूप आनंदित झाले आहेत. अल्लू सिरीश हा अल्लू कुटुंबातील सदस्य आहे. त्याचा मोठा भाऊ अल्लू अर्जुन हा आज तेलुगू सिनेसृष्टीतील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. 'कोठा जंता' आणि 'ओक्का क्षनाम' यांसारख्या चित्रपटांमुळे अल्लू सिरीशला ओळख मिळाली आहे.