‘कर गयी चुल’ च्या रिमिक्सची धूम!

By Admin | Updated: March 13, 2016 21:09 IST2016-03-13T21:09:11+5:302016-03-13T21:09:11+5:30

‘क पूर अँड सन्स’ मधील पार्टी साँग ‘कर गयी चुल’ हे सध्या बॉलीवूडमधील सर्वांत हिट साँग आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून त्याची चर्चा आणि त्याला लाइक्स मिळताना दिसत आहेत.

Smoke of 'Chaya Chul' remix! | ‘कर गयी चुल’ च्या रिमिक्सची धूम!

‘कर गयी चुल’ च्या रिमिक्सची धूम!

‘क पूर अँड सन्स’ मधील पार्टी साँग ‘कर गयी चुल’ हे सध्या बॉलीवूडमधील सर्वांत हिट साँग आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून त्याची चर्चा आणि त्याला लाइक्स मिळताना दिसत आहेत. ट्विटर, फेसबुक सगळीकडेच त्याची चर्चा आहे. याचे बीट्स खूपच पेपी आहेत. यात आलिया आणि सिद्धार्थची केमिस्ट्री अप्रतिम आहे. आलिया ज्याप्रकारे डान्स करते, ते पाहून कोणालाही त्या संगीतावर थोडेसे नाचावेसेच वाटेल. हे गाणे बादशाहने काही वर्षांपूर्वीच प्रदर्शित केले होते. ‘कर गयी चुल’ गाण्याच्या मुख्य गाण्याने एवढी धूम केली असताना आता त्याचे रिमिक्स आले आहे. हे रिमिक्स साँग ओरिजिनलपेक्षाही खूप जास्त एनर्जेटिक आहे. ‘कपूर अँड सन्स’ मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, फवाद खान आणि आलिया भट्ट हे मुख्य भूमिकेत आहे. शकुन बत्रा दिग्दर्शक तर करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनअंतर्गत चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे प्रोमोज हे अगोदरच बिग हिट झाले आहेत. यात ऋषी कपूर, रजत कपूर आणि रत्ना पाठक शाह हेदेखील आहेत.

Web Title: Smoke of 'Chaya Chul' remix!