बिग बॉस विजेती शिल्पा शिंदेने पॉर्न व्हिडीओ केला शेअर, हिना खान भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 19:40 IST2018-04-23T10:11:15+5:302018-04-23T19:40:04+5:30

शिल्पाने ट्विटरवर चक्क पॉर्न साईटची व्हिडीओ लिंक शिअर केली त्यामुळं नेटीझन्सने तिला ट्रोल केलं आहे.

Shilpa Shinde Shares MMS On Social Media, Gets Slammed By Hina Khan, Rocky Jaiswal | बिग बॉस विजेती शिल्पा शिंदेने पॉर्न व्हिडीओ केला शेअर, हिना खान भडकली

बिग बॉस विजेती शिल्पा शिंदेने पॉर्न व्हिडीओ केला शेअर, हिना खान भडकली

मुंबई -  'बिग बॉस 11'च्या अकाराव्या पर्वातील विजेती शिल्पा शिंदे आणि उपविजेती हिना खान यांच्यामध्ये सतत सोशल मीडियावर वाद सुरु असतो. शिल्पाने ट्विटरवर चक्क पॉर्न साईटची व्हिडीओ लिंक शिअर केली त्यामुळं नेटीझन्सने तिला ट्रोल केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून एक MMS व्हायरल होत होता, ज्यामध्ये दिसणारी महिला शिल्पा शिंदे असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता शिल्पाने तोच MMS आपल्या ट्विटरवरुन शेअर करत, आपल्याबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर निशाणा साधला. व्हिडीओ शेअर करताना शिल्पाने म्हटलं आहे की,  जो MMS माझा आहे असं सांगून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्या व्हिडीओमधील खरी मुलगी ही आहे. 

बिग बॉस 11 मध्ये तिची प्रमुख प्रतिस्पर्धी हिना खान आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकीने शिल्पावर हल्ला चढवला आहे. हिना आणि रॉकीने शिल्पावर सोशल मीडियावर पॉर्न पसरवल्याचा आरोप केला आहे.

ट्विटमध्ये शिल्पाने काय म्हटले?

कृपया हा व्हिडीओ पाहा. ज्यांना काही काम धंदा नाही, ते दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. हा त्या खऱ्या मुलीचा व्हिडीओ आहे, जो शिल्पा शिंदेच्या नावावर खपवला जात आहे 

रॉकीचे ट्विट 

“शिल्पा, तुझ्याबद्दल जे काही झालं ते दुर्दैवी आहे. तुला बोलण्याचा अधिकार आहे. मात्र मला तुला एक विचारायचं आहे की, तू जो व्हिडीओ शेअर केला आहेस, तो संबंधित महिलेचा असल्याचा पुरावा तुझ्याकडे आहे का? तू याबाबत दावा करु शकतेस का? एक जबाबदार सेलिब्रिटी म्हणून सोशल मीडियावर पॉर्न प्रमोट करण्याऐवजी कायद्याचा आधार घेता आला असता की नाही?” 


 

सर्वात आधी रॉकी जयस्वालने शिल्पावर सोशल मीडियावर पॉर्न पसरवल्याचा आरोप केला. त्यानंतर हिना खाननेही रॉकीचं म्हणणं खरं असल्याचं म्हणतं, ट्विट केलं.



 

 


 

Web Title: Shilpa Shinde Shares MMS On Social Media, Gets Slammed By Hina Khan, Rocky Jaiswal