संवेदनशील अश्विनी

By Admin | Updated: May 10, 2015 05:33 IST2015-05-10T05:33:32+5:302015-05-10T05:33:32+5:30

‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ ही डॉक्युमेंट्री सध्या जागतिक पातळीवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अश्विनी भावे या डॉक्युमेंट्रीच्या कार्यकारी निर्मात्या आहेत

Sensitive Ashwini | संवेदनशील अश्विनी

संवेदनशील अश्विनी

‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ ही डॉक्युमेंट्री सध्या जागतिक पातळीवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अश्विनी भावे या डॉक्युमेंट्रीच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाच्या समजल्या जाणाऱ्या सर्वच सिनेमहोत्सवांमध्ये ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ने आपला ठसा उमटवला आहे. टॉक्सिक केमिकल्स आज मानवाच्या जिवाला किती हानिकारक आहे याबाबतची माहिती ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’मध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे सामाजिक भान ठेवत अश्विनी भावेने लघुपटाच्या निर्मितीचा भार उचलला आहे. जनतेमध्ये याविषयाबाबत जागृती व्हावी या उद्देशाने ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ ही डॉक्युमेंट्री समाजाच्या डोळ्यांत अंजन घालणारी ठरतेय.

Web Title: Sensitive Ashwini