सैफ अली खानचं ऑटोबायोग्राफी लिहिणं कॅन्सल, म्हणाला - लोक शिव्या देतील....
By अमित इंगोले | Published: November 21, 2020 11:57 AM2020-11-21T11:57:40+5:302020-11-21T11:57:54+5:30
नुकताच सैफ अली खान आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस प्रसिद्ध सोशल मीडिया पर्सनॅलिटी आणि अभिनेता अमांडा सर्नीच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते.
![Saif Ali Khan reveals that he not going to write his autobiography and says people will abuse him for his honesty | सैफ अली खानचं ऑटोबायोग्राफी लिहिणं कॅन्सल, म्हणाला - लोक शिव्या देतील.... Saif Ali Khan reveals that he not going to write his autobiography and says people will abuse him for his honesty | सैफ अली खानचं ऑटोबायोग्राफी लिहिणं कॅन्सल, म्हणाला - लोक शिव्या देतील....](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/saif-ali-khan_20180474543.jpg)
सैफ अली खानचं ऑटोबायोग्राफी लिहिणं कॅन्सल, म्हणाला - लोक शिव्या देतील....
अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्या आगामी 'भूत पुलिस' सिनेमाचं शूटींग हिमाचल प्रदेशात करत आहे. काही दिवसांपूर्वी चर्चा सुरू होती की, सैफ अली खान त्याची ऑटोबायोग्राफी लिहिणार आहे. करिना कपूरनेही याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. पण आता एका मुलाखतीत सैफने सांगितले की, आता त्याला त्याची ऑटोबायोग्राफी लिहायची नाही आणि याचं कारणही सैफने सांगितलं.
नुकताच सैफ अली खान आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस प्रसिद्ध सोशल मीडिया पर्सनॅलिटी आणि अभिनेता अमांडा सर्नीच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. या मुलाखतीत सैफ अली खानने सांगितले की, ऑटोबायोग्राफी लिहिण्यासाठी तो फार उत्सुक आहे. पण आता त्याला ती लिहायची नाही. सैफ म्हणाला की, तो लोकांच्या शिव्या ऐकलण्यासाठी तयार नाही. कारण ज्या इमानदारीने आणि बिनधास्तपणे तो हे पुस्तक लिहेल त्यासाठी लोक त्याच्यावर टिका करतील.
असं असलं तरी सैफने अजून ही बाब त्याच्या प्रकाशकाला सांगितलेली नाही. तो पुढे म्हणाला की, भारतात ऑडियन्सचा एक असा वर्ग आहे जो फारच नकारात्मक आहे. त्यामुळे त्याला त्याच्या गोष्टी या लोकांसोबत शेअर करायच्या नाहीत. सैफने असंही सांगितलं की, होऊ शकतं की, मी माझी ऑटोबायोग्राफी लिहिण्याचा निर्णय मागे घेऊ शकतो.
दरम्यान, याआधी बॉम्बे हाऊससोबत बोलताना सैफ म्हणाला होता की, त्याच्या ऑटोबायोग्राफीमध्ये परिवार, घर, करिअर, सिनेमे, यश आणि अपयशाबाबत मोकळेपणाने चर्चा केली जाईल. हे पुस्तक आधी २०२१ मध्ये प्रकाशित होणार होतं. आता तर असं वाटतं की, सैफच्या फॅन्सना त्याच्या ऑटोबायोग्राफीची आणखी वाट बघावी लागू शकते.