आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

By ऋचा वझे | Updated: June 7, 2025 17:10 IST2025-06-07T17:09:05+5:302025-06-07T17:10:18+5:30

Sachin Tendulkar Meets Children: सचिनला पाहून सिनेमातील सर्व दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद पाहायला मिळाला.

Sachin Tendulkar came to Aamir Khan s house all the disabled children of Sitare Zameen Par rejoiced after seeing the surprise | आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

'द परफेक्शनिस्ट' आमिर खान (Aamir Khan) आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमातून भेटीला येत आहे. यामध्ये तो दिव्यांग मुलांच्या बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत आहे. या मुलांना बास्केटबॉल शिकवणं आणि त्यांना स्पर्धेत उतरवणं हे आव्हान त्याच्यासमोर असतं. आमिर खानच्या या सिनेमाचा ट्रेलर तर सगळ्यांनाच आवडलाय. 'लाल सिंग चड्डा'च्या अपयशानंतर इतक्या वर्षांनी आमिर पुन्हा समोर येत आहे. दरम्यान नुकतंच सिनेमाच्या निमित्ताने त्याने घरीच एका छोट्या पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही आमंत्रित केलं होतं. सचिनला पाहून सिनेमातील सर्व दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद पाहायला मिळाला.

आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' सिनेमातील मुलं खऱ्या आयुष्यात स्पेशल चाईल्ड आहेत. कालच आमिर खानने त्याच्या घरी छोटी पार्टी ठेवली. यामध्ये रणबीर कपूरही सहभागी झाला होता. तर आता नवीन व्हायरल व्हिडिओमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही आमिरच्या घरी येतो. पाठोपाठ मनसे नेते राज ठाकरे येतात. घरी आधीच उपस्थित असलेल्या सर्व दिव्यांग मुलांना सचिनला पाहून सुखद धक्काच बसतो. सगळे एका सुरात 'सचिनss सचिनss' चा जल्लोष करतात. हे पाहून सचिनही भारावतो आणि त्यांना जाऊन मिठी मारतो. हा गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


आमिरने घरी म्युझिकल नाईट आयोजित केली होती. यामध्ये अनेक सेलिब्रिटी हजर होते. रणबीर कपूर, कपिल शर्मा, शंकर महादेवन, सचिन तेंडुलकर, राज ठाकरे तसंच सिनेमातील सर्व कास्ट आणि त्यांचे कुटुंबीय, आमिरच्या घरातील मंडळी अशा सर्वांनीच ही नाईट एन्जॉय केली. 'सितारे जमीन पर' २० जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Sachin Tendulkar came to Aamir Khan s house all the disabled children of Sitare Zameen Par rejoiced after seeing the surprise