सचिनचा खाँसाहेब प्रेक्षकांना भावला

By Admin | Updated: November 14, 2015 02:32 IST2015-11-14T02:32:28+5:302015-11-14T02:32:28+5:30

भारतीय चित्रपटसृष्टीत गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे चतुरस्र अभिनेते म्हणजे सचिन पिळगावकर.

Sachin khansaheb bhagatake the audience | सचिनचा खाँसाहेब प्रेक्षकांना भावला

सचिनचा खाँसाहेब प्रेक्षकांना भावला

भारतीय चित्रपटसृष्टीत गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे चतुरस्र अभिनेते म्हणजे सचिन पिळगावकर. आजवर विविध चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू पसरविणारे सचिनजी ‘कट्यार काळजात घुसली’मधून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. यात त्यांनी साकारलेल्या खाँसाहेबांच्या भूमिकेला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत आहे. या भूमिकेद्वारे सचिनजी पहिल्यांदाच नकारात्मक व्यक्तिरेखा साकारत आहेत. राजगायकपदाच्या लालसेपायी कट-कारस्थाने रचणारा अहंकारी खाँसाहेब सर्वांच्या स्तुतीस पात्र ठरलाय. उर्दूतील चपखल संवादफेक, आक्रमक देहबोली, डोळ्यांतून दिसणारी ईर्ष्या, मनात दडलेली अहंकाराची भावना
या सर्व गोष्टी त्यांनी लीलया पडद्यावर साकारल्या आहेत. सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांना हे खाँसाहेब मनापासून भावले आहेत. स्वत: सचिनजींच्या मते, ही भूमिका म्हणजे त्यांच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट आहे. काल प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Sachin khansaheb bhagatake the audience