किरकोळ स्टंटदेखील जीवघेणा

By Admin | Updated: June 2, 2014 09:07 IST2014-06-02T09:07:59+5:302014-06-02T09:07:59+5:30

‘खिलाडी’ म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार हा चित्रपटातील आपले स्टंट स्वत:च साकारत असतो, परंतु किरकोळ स्टंटदेखील जीवघेणे ठरू शकतात, असा त्याचा दावा आहे.

The retail stunt is also fatal | किरकोळ स्टंटदेखील जीवघेणा

किरकोळ स्टंटदेखील जीवघेणा

‘खिलाडी’ म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार हा चित्रपटातील आपले स्टंट स्वत:च साकारत असतो, परंतु किरकोळ स्टंटदेखील जीवघेणे ठरू शकतात, असा त्याचा दावा आहे. ‘हॉलीडे’ या आगामी चित्रपटात अक्षयने अनेक स्टंट केले आहेत. स्टंट दृश्य लहान असो का मोठे, ते साकारताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे असते, कारण कोणत्याही क्षणी तो जीवघेणा ठरू शकतो. अनेकदा किरकोळ वाटणारे स्टंट साकारताना तुमच्या जीवावर बेतू शकतात, असे अक्षयने सांगितले. दक्षिण भारतीय चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास याने ‘हॉलीडे’चे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘गझनी’ची निर्मिती केली आहे. २०१२ या वर्षी रिलीज झालेल्या ‘थुपक्की’ या चित्रपटाचा ‘हॉलीडे’ हा रिमेक आहे. अक्षयची हिरोईन म्हणून पुन्हा एकदा सोनाक्षी दिसणार आहे. विपुल शाहची निर्मिती असणारा हा चित्रपट येत्या ६ जून रोजी रिलीज होणार आहे.

Web Title: The retail stunt is also fatal