रिलीजपूर्वीच ‘खिलाडी’च्या चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई

By Admin | Updated: March 17, 2017 05:43 IST2017-03-17T04:28:41+5:302017-03-17T05:43:17+5:30

चित्रपट रिलीज व्हायला सहा महिन्यांचा अवकाश आहे. एवढेच नाही तर चित्रपटाचा टीझरही अद्याप रिलीज झालेला नाही.

Records before the release of 'Khiladi' record breaks | रिलीजपूर्वीच ‘खिलाडी’च्या चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई

रिलीजपूर्वीच ‘खिलाडी’च्या चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17 - मेगास्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार यांचा ‘2.0’ या सिनेमाकडे सिनेप्रेमी डोळे लावून बसले आहेत. अर्थात यासाठी आपल्याला दिवाळीपर्यंत कळ सोसावी लागणार आहे. येत्या दिवाळी ‘2.0’ रिलीज होत आहे. पण त्याआधी या चित्रपटाने कमाईचा एक विक्रम केला आहे. चित्रपट रिलीज व्हायला सहा महिन्यांचा अवकाश आहे. एवढेच नाही तर चित्रपटाचा टीझरही अद्याप रिलीज झालेला नाही. तरीही हा चित्रपट आधीच शंभर कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे.

एका टेलिव्हिजनने या चित्रपटाचे तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषेतील सॅटेलाईट राईट्स ११० कोटींना विकत घेतले आहेत. या चित्रपटाचे एकूण बजेट होते साडेतीनशे कोटी. त्यामुळे त्यातले ११० कोटी आधीच वसूल झाले आहेत. सध्या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम अंतिम टप्प्यात आहे. २०१० मध्ये आलेल्या ‘रोबोट’ या सिनेमाचा हा सीक्वल असून ‘2.0’मध्ये रजनीकांत एका वैज्ञानिकाच्या आणि रोबोटच्या दुहेरी भूमिकेत बघावयास मिळणार आहे.

 

Web Title: Records before the release of 'Khiladi' record breaks