'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 14:44 IST2026-05-09T14:42:41+5:302026-05-09T14:44:09+5:30

'राजा शिवाजी'ने रिलीजच्या ८ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शुक्रवारी किती कमावले?

raja shivaji collection till now what film will perform on second weekend know more | 'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर

'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत 'राजा शिवाजी' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतोय. प्रदर्शनानंतर या चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा यशस्वीपणे पार केला असून आता याच्या ८ व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. जरी या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पकड मजबूत ठेवली असली, तरी ८ व्या दिवशी कमाईमध्ये किंचित घट पाहायला मिळाली आहे.

'सॅकनिल्क'च्या प्राथमिक अहवालानुसार, 'राजा शिवाजी'ने आपल्या प्रदर्शनाच्या ८ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शुक्रवारी ३.२० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. या नवीन आकड्यांसह चित्रपटाची एकूण आठ दिवसांची कमाई आता ५५.८५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. निर्मात्यांना अपेक्षा आहे की, येणाऱ्या दुसऱ्या वीकेंडला प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढल्यामुळे चित्रपटाच्या कमाईत पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळेल.

रितेश देशमुखच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा भव्य चित्रपट सुमारे १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात रितेश देशमुखसोबत जिनिलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन आणि भाग्यश्री पटवर्धन यांसारख्या तगड्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याव्यतिरिक्त, बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानचा विशेष कॅमिओ हे या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे.

'राजा शिवाजी' चित्रपटाची आतापर्यंतची कामगिरी पाहता, तो आपल्या बजेटच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. चित्रपटातील हाय-व्होल्टेज ॲक्शन आणि ऐतिहासिक कथानकामुळे मराठी आणि हिंदी अशा दोन्ही प्रेक्षकांकडून चित्रपटाला दाद मिळत आहे. आगामी काळात हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये कधी सामील होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : 'राजा शिवाजी' की शानदार कमाई, दूसरे शुक्रवार के आंकड़े सामने!

Web Summary : रितेश देशमुख की 'राजा शिवाजी' ने ₹50 करोड़ पार किए, आठवें दिन ₹3.20 करोड़ कमाए, कुल ₹55.85 करोड़। ₹100 करोड़ के बजट में बनी फिल्म में कई कलाकार और सलमान खान का कैमियो है, जिससे दर्शक 100 करोड़ क्लब की ओर आकर्षित हैं।

Web Title : Raja Shivaji Movie Earns Big, Second Friday Box Office Numbers!

Web Summary : Riteish Deshmukh's 'Raja Shivaji' crosses ₹50 crore, earning ₹3.20 crore on its eighth day, totaling ₹55.85 crore. The film, made on a ₹100 crore budget, features an ensemble cast and a Salman Khan cameo, driving audience interest towards the 100 crore club.