सुपरहिट मालिका अन् दीपिका पादुकोणसोबत केलं होतं काम, रस्ते अपघातात जीव गमावणारी वैभवी उपाध्याय कोण होती?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 01:39 PM2023-05-24T13:39:20+5:302023-05-24T16:38:47+5:30

हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

'साराभाई वर्सेस साराभाई 2' या शोमध्ये जॅस्मीन ही भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचं निधन झालं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. ती फक्त ३९ वर्षांची होती. (फोटो इन्स्टाग्राम)

वैभवी उपाध्याय तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर हिमाचलमध्ये फिरण्यासाठी गेली होती.रस्त्यावरुन वळण घेत असताना वैभवीची कार दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या हृदयद्रावक घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

मिळालेल्या माहितीनुसार, वैभवी आणि जयसोबत फॉर्च्युनर कारमध्ये होती. दोघेही तीर्थक्षेत्र बंजार खोऱ्यात फिरायला जात होते. त्याचवेळी बंजारजवळील सिधवा येथे त्यांच्या कारचे अचानक नियंत्रण सुटले आणि त्यानंतर कार रस्त्याच्या जवळपास ५० फूट खोल दरीत कोसळली. (फोटो इन्स्टाग्राम)

वैभवीने तिच्या कार्यकाळात अनेक दिग्ग्ज कलाकारांबरोबर काम करून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली, ती मूळची मुंबईची होती. वैभवी ही कुटुंबीयांसोबत मुंबईत राहत असे. (फोटो इन्स्टाग्राम)

‘साराभाई वर्सेस साराभाई’या मालिकेत अभिनेत्रीने जस्मिनची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून वैभवी घराघरांत पोहोचली. (फोटो इन्स्टाग्राम)

यानंतर तिने ‘क्या कुसूर है अमला का’, ‘सीआयडी’, ‘अदालत’ या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. (फोटो इन्स्टाग्राम)

वैभवी उपाध्याय हे गुजराती थिएटर सर्किटमध्ये खूप लोकप्रिय नाव होतं. त्यामुळेच वैभवीच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

वैभवीने २०२० साली दीपिका पादुकोणसोबत 'छपाक' आणि 'तिमिर' (२०२३) या सिनेमांमध्ये काम केलं होतं. अनेक गुजराती नाटकांमध्येही तिने काम केलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

अ‍ॅमेझॉन मिनी टीव्हीवरील गाजलेली वेब सीरिज ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ यामध्ये वैभवीने आयुष मेहरा आणि बरखा सिंगबरोबर काम केले होते.(फोटो इन्स्टाग्राम)