नवाजुद्दीनच्या एक्स गर्लफ्रेंडनेही केलंय Panchayat 2 मध्ये काम; 'क्रांती'ची रिअल लाइफ लव्हस्टोरी आहे भन्नाट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 12:57 PM2022-05-26T12:57:33+5:302022-05-26T13:02:11+5:30

Panchayat 2:सुनीता केवळ अभिनेत्रीच नाही तर डायरेक्टर व स्क्रीन रायटरदेखील आहे. तिने २००३ ते २०२० पर्यंत चित्रपटांमध्ये लागोपाठ काम केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर Panchayat 2 या वेब सीरिजची जोरदार चर्चा सुरु आहे. दमदार कथानकासह या सीरिजमधील प्रत्येक कलाकार चर्चेत येत आहे.

अलिकडेच या सीरिजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. तेव्हापासून यातील कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफदेखील चर्चेत येत आहे.

सध्या सोशल मीडियावर या सीरिजमधल्या क्रांती देवी म्हणजेच बिट्टू की मम्मीची चर्चा रंगली आहे.

अनेक गाजलेल्या मालिका, जाहिरातींमध्ये झळकलेल्या सुनीता राजवरने (Sunita Rajwar) या सीरिजमध्ये क्रांतीदेवीची भूमिका साकारुन लोकप्रिय मिळवली आहे.

उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी सुनीता सध्या तिच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत येत आहे. खऱ्या आयुष्यात सुनीता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची एक्स गर्लफ्रेंड आहे. याविषयी नवाजने स्वत: त्याच्या ऑटोबायोग्राफी 'एन ऑर्डिनरी लाइफ' मध्ये याविषयी नमूद केलं आहे.

नवाज आणि सुनीता यांनी जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केलं. मात्र, त्यानंतर नात्यात वितुष्ट आल्यामुळे सुनीताने नवाजची साथ सोडली.

नवाजची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे सुनीताने त्याची साथ सोडल्याचं नवाजने म्हटलं आहे. मात्र, याविषयी सुनीताने एक मोठी पोस्ट लिहित तिचं स्पष्टीकरण दिलं होतं.

नवाजला सोडल्यानंतर सुनीताने आलोक सिंहसोबत लग्न केलं. मात्र, तिच्या नवऱ्याविषयी फारशी माहिती कोणालाही नाही.

सुनीता केवळ अभिनेत्रीच नाही तर डायरेक्टर व स्क्रीन रायटरदेखील आहे. तिने २००३ ते २०२० पर्यंत चित्रपटांमध्ये लागोपाठ काम केलं आहे.

'केदारनाथ', 'स्त्री', 'बाला' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' अशा अनेक सिनेमांसाठी तिने काम केलं आहे. तसंच 'मैं, मेरी पत्नी और वो' साठी तिने सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली आहे.

सुनिताने ११ चित्रपट, १२ टीव्ही शोमध्ये काम केलं असून तिचं नेटवर्थ १ मिलिअन डॉलर म्हणजेच ७ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं.