इंडियन पुलिस फोर्स ते कुब्रा! हा weekend ठेवा राखून; OTT रिलीज होतायेत हे दमदार सिनेमा, वेबसीरिज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 04:00 PM2024-01-19T16:00:00+5:302024-01-19T16:00:00+5:30

OTT: यावेळचा विकेंड होणार खास, रिलीज होतायेत जबरदस्त सिनेमा अन् वेबसीरिज

बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी याने नुकतंच ओटीटीवर पदार्पण केलं आहे. रोहितची इंडियन पुलिस फोर्स ही सीरिज येत्या १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमेझॉन प्राइम व्हिडीओवर ही सीरिज रिलीज होणार आहे.

सध्या सोशल मीडियावर कुब्रा या तुर्किश थ्रिलर मुव्हीची जोरदार चर्चा आहे. नुकताच हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. त्यामुळे हा विकेंड प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा ठरणार आहे.

द मार्वेल्स पाहण्याऱ्या प्रेक्षकांची संख्या काही कमी नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज झालेला द मार्वेल्स नुकताच (१६ जानेवारी) युट्यूबवर रिलीज झाला आहे. त्यामुळे शनिवारी किंवा रविवारी तुम्ही नक्कीच तो पाहू शकता.

एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन हा तेलुगू सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. येत्या १९ तारखेला हा सिनेमा डिझ्नी प्लस हॉटस्टावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

जोए हा देखील एक तामिळ सिनेमा आहे. हा सिनेमा १९ जानेवारीला डिझ्नी प्लस हॉटस्टावर रिलीज होणार आहे.

हेज्बिन हॉटेल ही एक अॅनिमेटेड सीरिज आहे. ही सीरिज १९ जानेवारीला अॅमेझॉन प्राइमवर पाहता येणार आहे.