Vaishali Thakkar Suicide: वैशाली जगातून निघून गेली, पण जाता जाता तिने जगाला 'दृष्टी' दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 04:17 PM2022-10-18T16:17:24+5:302022-10-18T16:26:44+5:30

या सगळ्यात आता आणखी एक बातमी समोर आली आहे, ज्यानंतर लोकांच्या नजरेत वैशालीबाबतचा आदर आणखी वाढला आहे.

वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar)च्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. टीव्ही अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या केली. (फोटो इन्स्टाग्राम)

आत्महत्या करण्यापूर्वी अभिनेत्रीनं एवढं मोठं पाऊल उचलण्यामागचे कारण तिच्या डायरीत लिहून ठेवलं आहे. . (फोटो इन्स्टाग्राम)

वैशालीला गेल्या अडीच वर्षांत खूप त्रास सहन करावा लागला. हे कळल्यानंतर चाहते तिच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

या सगळ्यात आता आणखी एक बातमी समोर आली आहे, ज्याबद्दल जाणून घेतल्याने लोकांच्या नजरेत वैशालीबाबतचा आदर वाढला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

गेल्या अडीच वर्षांत त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. मात्र, या अभिनेत्रीने जगातून जाताना कोणाला तरी आयुष्यभराचा आनंद देऊन गेली. (फोटो इन्स्टाग्राम)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैशाली ठक्करला तिचे डोळे खूप आवडायचे. ती नेहमी म्हणायची की देवाने तिला खूप सुंदर डोळे दिले आहेत, त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर तिचे डोळे दान करावेत जेणेकरुन या सुंदर डोळ्यांनी इतर कोणी ती जग पाहू शकेल. तिच्या कुटुंबीयांनी तिची ही इच्छा पूर्ण केली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या अंत्यसंस्कारापूर्वी वैशालीच्या नातेवाईकांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तिचे डोळे दान केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

वैशाली ठक्कर हिने इंदूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा यांचे नाव समोर आले आहे. (फोटो इन्स्टाग्राम

या अभिनेत्रीने मरण्यापूर्वी तिच्या डायरीमध्ये तिच्या मृत्यूसाठी दोघांना जबाबदार धरले होते, त्यानंतर दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(फोटो इन्स्टाग्राम)