Vaishali Takkar: वारंवार लोकेशन बदलत होता राहुल, अखेर पोलिसांनी रचला असा सापळा आणि आवळल्या त्याच्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 01:48 PM2022-10-20T13:48:46+5:302022-10-20T14:16:58+5:30

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशालीच्या सुसाईड नोटमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख पाहिल्यानंतर आरोपी राहुल पकडण्यासाठी पोलिसांनी लगेचच वैशालीच्या शेजारच्या घरी धाव घेतली, परंतु तो तेथून फरार झाला होता.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्रीच्या आईने तिचा शेजारी राहणारा राहुल नवलानीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. याशिवाय वैशालीच्या सुसाइड नोटमध्ये अभिनेत्रीने तिच्या आत्महत्येसाठी राहुलला जबाबदार धरले होते. (फोटो इन्स्टाग्राम)

त्यानंतर इंदूर पोलिसांनी आरोपीला काल म्हणजेच बुधवारी अटक केली आहे. वैशालीच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर राहुल फरार झाला होता. (फोटो इन्स्टाग्राम)

इंदूर पोलिसांनी राहुलला अटक केली असून त्याचे गॅजेट्स जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल इंदूर-देवास दरम्यान एका ढाब्यावर लपला होता. (फोटो इन्स्टाग्राम)

वैशालीच्या सुसाईड नोटमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख पाहिल्यानंतर आरोपी राहुल पकडण्यासाठी पोलिसांनी लगेचच वैशालीच्या शेजारच्या घरी धाव घेतली, परंतु तो तेथून फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी राहुलला पकडण्यासाठी सापळा रचला होता. (फोटो इन्स्टाग्राम)

फरार पती-पत्नीला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार करून त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात पाठवले. (फोटो इन्स्टाग्राम)

ज्याठिकाणी पोलिसांना त्याच्या असण्याची कल्पना आली तेथे पथक पाठवून शोध सुरू केला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध परिपत्रक नोटीसही बजावली होती आणि पाच हजार रुपयांचे बक्षीसही ठेवले होते.(फोटो इन्स्टाग्राम)

पोलिसांची राहुलवर सतत नजर होती, मात्र तो वारंवार आपले ठिकाण बदलत होता. (फोटो इन्स्टाग्राम)

बुधवारी पोलिसांना राहुल इंदूरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ राहुलला चेकिंग पॉईंटवर पकडले आणि दोघांविरुद्ध कलम 306 अन्वये गुन्हा दाखल केला.(फोटो इन्स्टाग्राम)