PICS : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम सन्नीदानं घेतलं नवं घर; पाहा, सेलिब्रिटी कपलच्या गृहप्रवेशाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 03:03 PM2022-07-01T15:03:36+5:302022-07-01T15:11:05+5:30

Tujhyat Jeev Rangla fame actor Raj Hanchnale new home: सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या सेलिब्रिटी कपलने नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केला. मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस चांदेकर यांच्यानंतर आता आणखी एका सेलिब्रिटीनं नवं घर खरेदी केलं आहे.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या सेलिब्रिटी कपलने नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केला. मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस चांदेकर यांच्यानंतर आता आणखी एका सेलिब्रिटीनं नवं घर खरेदी केलं आहे.

होय, या कपलचं नाव आहे राज हंचनाळे आणि मॉली डिसवाल या कपलने नुकतंच मुंबईत त्यांचं स्वप्नातलं घर खरेदी केलं. नुकतंच त्यांनी या नव्या घरात गृहप्रवेश केला.

राज आणि पत्नी मॉलीने यांनी सोशल मीडियावर नव्या घराच्या बाल्कनीतले दोन फोटो शेअर करत, ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.

राज हंचनाळे याला तुम्ही ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत पाहिलं असेलच. यातला राणादाचा भाऊ म्हणजेच राज हंचनाळे. होय, या मालिकेत त्याने सनी दाची भूमिका साकारली होती.

2019 मध्ये राज व मॉली यांनी लग्न केलं होतं. 2013 पासून दोघंही एकमेकांना ओळखत होते. मॉली ही हरयाणाची आहे.

लवकरच राज हंचनाळे एका नव्या मालिकेत झळकणार आहे. ‘जीवाची होतिया काहिली’ या मालिकेतून पुन्हा पडद्यावर कमबॅक करत आहे.

‘जीवाची होतिया काहिली’ ही राजची नवी मालिका येत्या 18 जुलैपासून सुरू होतेय. यात त्याच्यासोबत अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

या मालिकेत मराठी आणि कानडी भाषांचा मिलाप पाहायला मिळणार आहे. राज अस्सल कोल्हापुरी मुलाची तर प्रतीक्षा कानडी मुलीची भूमिका साकारते आहे.