IN PICS : राहुल द्रविडशी तुझं खरंच नातं आहे का? मराठमोळी अभिनेत्री अदिती द्रविडने अखेर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 11:54 AM2022-07-20T11:54:27+5:302022-07-20T12:01:16+5:30

Sundara Manamdhe Bharali fame Aditi Dravid : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अदिती द्रविड हिचं आडनाव वाचून हिचं राहुल द्रविडशी काही नातं आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो...

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अदिती द्रविड हिचं आडनाव वाचून एक प्रश्न तर पडला असेलच. होय, हिचं राहुल द्रविडशी काही नातं आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

तर आता खुद्द अदितीने याचा खुलासा केला आहे. होय, क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला राहुल द्रविड आणि मराठी अभिनेत्री अदिती द्रविड यांचं खास नातं आहे.

‘माझ्या नवºयाची बायको’ आणि ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून अदिती घराघरात पोहोचली. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय आहे.

नुकतंच अदितीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला. आस्क मी एनिथिंग या सेशनमध्ये तिने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. यादरम्यान एका चाहत्याने तिला राहुल द्रविडबद्दल प्रश्न केला.

राहुल द्रविड व तुझ्यात खरंच काही नातं आहे का? की या सगळ्या अफवा आहेत? असा प्रश्न एका चाहत्याने केला. याला उत्तर देत अदितीने राहुल द्रविडसोबतचा बालपणीचा एक फोटो शेअर केला.

‘हे खरं आहे. राहुल द्रविड माझे चुलत काका आहेत,’ असा खुलासा तिने केला. याआधी तिनं राहुल द्रविडला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हाच बालपणीचा फोटो शेअर केला होता.

आदितीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत नंदिनी ही व्यक्तिरेखा साकारतेय. या मालिकेतील तिने साकारलेली भूमिका चाहत्यांना चांगलीच भावली आहे.

त्याआधी आलेली ‘वीरांगणा’ ही शॉर्ट फिल्मही गाजली होती. पॅरिस फिक्टिव्हा फेस्टिव्हलमध्ये निवड झालेली भारतातली ही एकमेव शॉर्ट फिल्म आहे. लघुपटाची संपूर्ण संकल्पना आदितीची होती.

‘माझ्या नवºयाची बायको’ या मालिकेत अदितीने शनायाच्या मैत्रिणीची म्हणजेच ईशाची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचंही चांगलंच कौतुक झालं होतं.