Bigg Boss 17 : TV च्या 'या' संस्कारी सुनांनी पटकावलीय बिग बॉसची ट्रॉफी; यंदाही इतिहास रचणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 02:20 PM2024-01-28T14:20:29+5:302024-01-28T14:36:24+5:30

Bigg Boss 17 : यंदा टेलिव्हिजनवरची ही संस्कारी सून बिग बॉसची विजेती होणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बिग बॉसच्या 17व्या सीझनचा ग्रँड फिनाले आज होणार आहे. मुनव्वर फारुकी, अरुण महाशेट्टी, अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा हे टॉप 5 मध्ये आहेत. या सर्व स्पर्धकांमध्ये 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे ही विजयाची दावेदार मानली जात आहे.

मुनव्वर आणि अभिषेक यांच्या नावाची देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहेत. अशा परिस्थितीत अंकिता, अभिषेक आणि मुनव्वर यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. यंदा टेलिव्हिजन वरची ही संस्कारी सून बिग बॉसची विजेती होणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बिग बॉसमध्ये या देखील अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी सहभाग घेतला आहे. टेलिव्हिजन वरच्या संस्कारी सुनांनी बिग बॉसची ट्रॉफी पटकावली आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया...

श्वेता तिवारी एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या लोकप्रिय शोसाठी ओळखली जाते. श्वेता या शोची मुख्य अभिनेत्री होती. 'कसौटी जिंदगी की' द्वारे घराघरात लोकप्रिय झाल्यानंतर तिने 'बिग बॉस 4' मध्ये भाग घेतला. बिग बॉसच्या घरात अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर अखेर ती या शोची विजेती म्हणून बाहेर आली.

जुही परमारने 'कुमकुम' या टीव्ही शोमुळे घराघरात आपलं नाव निर्माण केलं. टीव्ही सीरियल्समधून प्रसिद्धी मिळवल्यानंतर ती 'बिग बॉस 5' मध्ये पोहोचली. जुहीने बिग बॉसमध्ये केवळ चांगला खेळ केला नाही तर तिने या शोची ट्रॉफीही जिंकली.

उर्वशी ढोलकिया 'कसौटी जिंदगी की' मधील कोमालिकाची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. उर्वशी 'बिग बॉस 6' ची विजेती ठरली.

'भाभी जी घर पर हैं' या शोने लोकांची मने जिंकणाऱ्या शिल्पा शिंदेने 'बिग बॉस 11'ची ट्रॉफी जिंकली. या सीझनमध्ये हिना खानने तिला कडवी टक्कर दिली. पण शेवटी शिल्पा जिंकली.

'ससुराल सिमर का' फेम दीपिका कक्कर 'बिग बॉस 12'ची विजेती ठरली आहे. दीपिकाचे असंख्य चाहते असून ते नेहमीच तिला सपोर्ट करत असतात.

रुबिना दिलीक 'शक्ती' आणि 'छोटी बहू' सारख्या टीव्ही मालिकांसाठी ओळखली जाते. रुबीना 'बिग बॉस 14' मध्ये सहभागी झाली होती. तिने हा शो इतका जबरदस्त खेळला की तिला लेडी बॉसचा टॅग देण्यात आला.

बिग बॉसचा 16वा सीझन तेजस्वी प्रकाशने जिंकला होता. या सीझनमध्ये तिच्यासोबत करण कुंद्रा आणि प्रतीत सहजपाल सारखे स्ट्राँग स्पर्धक होते. पण तेजस्वीच्या फॅन फॉलोइंगने तिला शोची विजेती बनवलं.