अपने ही रंग में मुझ को रंग दे! शिवाली परबच्या फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 03:43 PM2024-03-27T15:43:36+5:302024-03-27T16:12:57+5:30

Shivali parab: नुकतंच शिवालीने एक सिंपल फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधील काही निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या गाजलेल्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.

उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर शिवालीने मराठी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

कल्याणची चुलबूली या नावाने शिवाली विशेष लोकप्रिय आहे. सोशल मीडियावरही तिचा तगडा वावर आहे.

शिवाली कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली शिवाली बऱ्याचदा तिचं फोटोशूट करत असून तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

नुकतंच शिवालीने एक सिंपल फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधील काही निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शिवालीने निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे. तिच्या फोटोवर सध्या चाहते कमेंटचा पाऊस पाडत आहेत.