मुहब्बत वाले दिलों की बात..; जांभळ्या साडीत खुललं प्राजक्ता माळीचं सौंदर्य, सारेच करतायत वाहवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 12:51 AM2023-10-12T00:51:11+5:302023-10-12T01:12:45+5:30

प्राजक्ताने नेसलेल्या इंडो-वेस्टर्न साडीवरचं डिझाइन खूपच रेखीव आहे

Prajakta Mali Saree Photos: महाराष्ट्राची हास्यजत्रा या टीव्ही शो मुळे मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या बरीच चर्चेत असते.

मराठी चित्रपटसृष्टीत आणि मालिकांमध्ये अभिनय करून प्राजक्ता माळी लोकांच्या घराघरात पोहोचली.

सध्या मात्र प्राजक्ता केवळ अभिनयामुळेच नव्हे तर तिच्या अनोख्या फॅशन सेन्समुळेही चर्चेचा विषय ठरत आहे.

प्राजक्ता आपल्या इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या फोटोशूटमधील फोटो शेअर करत असते. फोटोसोबतच त्याचे कॅप्शनदेखील अनोखे असतात.

नुकताच प्राजक्ताने जांभळ्या रंगाच्या इंडो वेस्टन साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ताच्या या फोटोंनी इंटरनेटवर चांगलीच चर्चा रंगली असून त्यासोबत तिने पत्ता पत्ता बूटा बूटा गाण्याचे शब्दही लिहिले आहेत

तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य - @prajakta_official Instagram)