आधी मराठी वेब सिरीजमध्ये Nude सीन, आता नयना मुकेचे सुपर बोल्ड फोटोशूट... पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 04:07 PM2024-04-19T16:07:02+5:302024-04-19T16:30:55+5:30

Nayannah Mukey Bold photoshoot: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मराठी मालिकेतही नयना झळकली आहे

Nayannah Mukey Bold photoshoot: सध्याचा काळ हा OTTचा काळ आहे. हल्ली चित्रपट आणि मालिकांसोबतच बेव सिरीजमध्ये अनेक अभिनेते-अभिनेत्री आपले नशीब आजमावतात.

नयना मुके ही देखील एक मराठमोळी बोल्ड अन् बिनधास्त अभिनेत्री आहे. झी5 च्या सेक्स ड्रग्स अँड थिएटर या वेब सिरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.

नयनाने या वेब सिरिजमध्ये मराठी अभिनेत्यांसोबत काही बोल्ड सीन्स शूट केले होते. त्यात एका न्यूड सीनचा देखील समावेश होता. (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

बेव सिरिज मध्ये न्यूड सीन दिलेल्या नयनाने ये रे ये रे पैसा, अनवट, रानटी अशा मराठी चित्रपटातही काम केले आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मराठी मालिकेतही ती झळकली आहे.

सध्या मात्र तिच्या एका हॉट आणि बोल्ड अशा फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगली आहे. नयनाने नुकताच एक फोटोशूट इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

तिने एक डीपनेक ड्रेस घातला आहे. 'तुमच्या अंतरंगात जसेजसे प्रेम वाढते, तशीच तुमच्या सौंदर्यातही वाढ होत जाते' असे कॅप्शनदेखील तिने फोटोंसह लिहीले आहे. (सर्व फोटो सौजन्य- नयना मुके Instagram)