'या' गावाची सून होणार अंकिता वालावलकर, 'कोकण हार्टेड बॉय'ने दाखवली घराची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:19 IST2025-02-13T13:14:10+5:302025-02-13T13:19:25+5:30

कुणाल भगतने घरी मांडव पूजा केली. तुम्ही पाहिलंत का 'कोकण हार्टेड बॉय'चं घर!

'कोकण हार्टेड गर्ल' नावाने युट्यूबवर प्रसिद्ध असलेली आणि नंतर बिग बॉस मराठीमुळे घराघरात पोहोचलेली अंकिता प्रभू वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. संगीतकार कुणाल भगतसोबत ती लग्न करत आहे.

अंकिता आणि कुणालने काही दिवसांपूर्वीच प्री वेडिंग फोटोशूट केलं. त्यांचा प्री वेडिंग म्युझिक व्हिडिओचं खूप कौतुक झालं कारण अंकिताने यात तिच्या कुटुंबालाही सहभागी करुन घेतलं होतं.

सध्या अंकिता आणि कुणालच्या घरी लग्नाची लगबग सुरु आहे. अंकिताचं कोकणातील गाव देवबाग इथेच लग्नसोहळा पार पडणार आहे. यासाठी वऱ्हाडी मंडळीही पोहोचली आहेत.

अंकिताचं कुटुंब तर सगळ्यांनाच माहित आहे. तिचे आई वडील, तीन बहिणी यांना आपण तिच्या व्लॉगमधून पाहिलंच आहे. पण अंकिताचा होणारा नवरा कुणालच्या कुटुंबियांची ओळख अजून तिने करुन दिलेली नाही.

काही दिवसांपूर्वीच अंकिताने तिच्या एका व्लॉगमध्ये कुणालच्या घराची झलक दाखवली. लग्नाच्या काही दिवस आधी कुणाल त्याच्या घरी मांडव पूजनेसाठी गेला होता. याचा व्हिडिओ तिने शेअर केला.

कुणाल रायगड जिल्ह्यातील माणगावचा आहे. तिथे त्याचं घर आहे. व्लॉगमधून त्याच्या घराची ही झलक दिसते. निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे त्याचं बैठं घर आहे. 'अनुबंध' असं त्याच्या घराचं नाव आहे.

आता कुणालचे आईवडील नक्की कोण आहेत, त्याच्या घरी कोण कोण आहे हे मात्र अजून दोघांनी सांगितलेलं नाही. अंकिता लग्नातच त्यांची ओळख चाहत्यांना करुन देणार आहे.

१६ फेब्रुवारी रोजी कुणाल आणि अंकिताचं शुभमंगल पार पडणार आहे. सध्या अंकिताच्या देवबाग येथे लग्नाविधींना सुरुवातही झाली आहे.