'भाभीजी घर पर हैं'ची अनिता भाभी आहे प्रेग्नंट; विदिशा श्रीवास्तव घेणार मालिकेतून ब्रेक?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 06:30 PM2023-03-19T18:30:00+5:302023-03-19T18:30:00+5:30

Vidisha srivastava:विदिशा मूळची उत्तर प्रदेशमधील बनारस येथील आहे. २०१८ मध्ये तिने सायक पॉलसोबत लग्नगाठ बांधली.

भाभीजी घर पर हैं या गाजलेल्या मालिकेतील गोरी मैम म्हणजेच अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव सध्या चर्चेत येत आहे.

विदिशा श्रीवास्तव प्रग्नंट असून ती लवकरच आई होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, विदिशा ६ महिन्यांची प्रेग्नंट आहे. त्यामुळे जून महिन्यात ती तिच्या बाळाला जन्म देणार आहे. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या संगोपनासाठी विदिशा ३ महिन्यांचा ब्रेकही घेणार आहे.

विदिशा प्रेग्नंट असल्यामुळे तिच्या पुढील भागांचं चित्रीकरण आधीच करुन ठेवण्यात आलं आहे. यापूर्वी सौम्या टंडन मॅटर्निटी लिव्हवर गेली होती त्यावेळी देखील मालिकेच्या मेकर्सने असंच केलं होतं.

विदिशा मूळची उत्तर प्रदेशमधील बनारस येथील आहे. २०१८ मध्ये तिने सायक पॉलसोबत लग्नगाठ बांधली.

सायक पॉलसोबत विदिशाने गुपचूप लग्न केलं होतं. विशेष म्हणजे विदिशाने जवळपास ४ वर्ष ही गोष्ट लपवून ठेवली. अलिकडेच तिच्या लग्नाचं सत्य समोर आलं आहे.

सोशल मीडियावर विदिशाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा होत असतानाच याविषयी विदिशाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

भाभाजी घर पर हैं या मालिकेत आतापर्यंत तीन अभिनेत्रींनी अनिता भाभीची भूमिका केली आहे. यात पहिले सौम्या टंडन, नेहा पेंडसे आणि आता विदिशा श्रीवास्तव या अभिनेत्रींचा समावेश आहे.