लेक करणच्या लग्नात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली सनी देओल यांची पत्नी, पूजाच्या साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 11:27 AM2023-06-19T11:27:15+5:302023-06-19T11:43:40+5:30

लाईमलाईटपासून कायम दूर राहणाऱ्या पूजा देओल करणच्या लग्नात पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आल्या.

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारे अभिनेते सनी देओल हे धर्मेन्द्र यांचा पुत्र आहेत, हे आपण सगळेच जाणतो. पण सनी देओल यांच्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे.

सनी देओल अनेकदा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. पण पत्नी पूजा देओल हिचा फोटो मात्र चुकूनही त्यांच्या सोशल अकाऊंटवर दिसत नाही.

सनी देओल यांची पत्नी आणि करणची आई पूजा नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहतात. मात्र लेकाच्या लग्नात आपल्या सौंदर्याने त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

सध्या देओल कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. सनी देओल यांचा थोरला लेक करण देओलचं लग्न झालं आहे.

धर्मेन्द्र यांची मोठी सून पूजा देओल मीडियापासून कायम दूर राहिली. मुलगा करण देओलच्या लग्नाच्या वरातीत पूजा कॅमेऱ्यात कैद झाल्या.

पूजा देओल यांनी लेकाच्या लग्नात पिस्ता रंगाचा लाचा परिधान केला होता, ज्यामध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या.

करण देओल आणि द्रिशा आचार्यचा १८ जूनला लग्नसोहळा मुंबईत पार पडला.

सनी देओल यांची पत्नी पूजा देओल यांनी लंडनमध्ये शिक्षण घेतले आहे आणि तिथेच त्या वाढल्या आहेत.

पूजा देओल आणि सनी देओलचं लग्न हे अरेंज्ड मॅरेज होते बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याआधीच सनी यांनी पूजासोबत लग्न केले होते.