Sidharth Malhotra and Kiara Advani : भांगेत कुंकू, हातात चूडा, गळ्यात मंगळसूत्र..., सासरी पोहोचली कियारा, असं झालं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 10:09 AM2023-02-09T10:09:16+5:302023-02-09T10:54:46+5:30

Newlywed Sidharth Malhotra and Kiara Advani : कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नानंतर ज्या फोटोंची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर ते फोटो समोर आलेत आहेत.

कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नानंतर ज्या फोटोंची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर ते फोटो समोर आलेत आहेत.

लग्नानंतर पहिल्यांदा नवविवाहित जोडपं मीडियासमोर आलं. या नववधू व वराला पाहून चाहते जणू क्रेझी झालेत.

कियारा व सिद्धार्थ काल रात्री दिल्लीला पोहोचले. लाल रंगात नववधू व वर दोघांनी पापाराझींना मस्तपैकी हसत पोझ दिल्यात.

लग्नानंतर पहिल्यांदा कियारा सासरी पोहोचली. सासरी तिचं जंगी स्वागत झालं. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता.

लाल रंगाचा सलवार सूट, भांगेत कुंकू, हातात चूडा, गळ्यात मंगळसूत्र, मोकळे केस आणि चेहऱ्यावर न मावणारा आनंद अशा थाटात नववधू कियाराची दिल्ली विमानतळावर एन्ट्री झाली.

सिद्धार्थही लाल रंगाचाच कुर्ता, पायजामा आणि त्यावर फ्लोरल स्कार्फ अशा अवतारात राजबिंडा दिसत होता.

एअरपोर्टवर दोघांनी पापाराझींना मिठाई वाटून आनंद साजरा केला. आज दिल्लीत कियारा व सिद्धार्थचं रिसेप्शन होणार आहे.

७ फेब्रुवारीला सिद्धार्थ व कियाराने राजस्थानातील जैसलमेर येथे लग्नगाठ बांधली. बॉलिवूड इंडस्ट्रीचे काही मोजेके मंडळी या लग्नाला हजर होते.

सिद्धार्थ-कियाराच्या शाही लग्नसोहळ्यावर तीन दिवसांसाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

आज ९ फेब्रुवारीला सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्याचे सर्व नातेवाईक, जवळचे मित्र आणि इतर सेलिब्रिटींसाठी रिसेप्शन पार्टी देणार आहे.